विज्ञान भारतीचा स्थापना दिन उत्साहात

30 Oct 2023 21:27:46
नागपूर, 
Vigyan Bharati : स्वदेशी विज्ञानाचा प्रचार- प्रसार करणारी चळवळ आणि पारंपरिक व आधुनिक विज्ञानाच्या समन्वयाने वैज्ञानिक विकासाचे उद्दिष्ट असणार्‍या विज्ञान भारतीचा स्थापना दिन शुक्रवारी उत्साहात झाला. ज्येष्ठ मार्गदर्शक शंकरराव तत्ववादी, विज्ञान भारतीचे विदर्भ अध्यक्ष व नीरीचे निवृत्त संचालक सतीश वटे, सल्लागार मॉइलचे निवृत्त सीएमडी गुरुराज कुंदरगी, सहसचिव प्रकाश इटनकर, कोषाध्यक्ष प्रद्युम्न सौचे, शासकीय दंत महाविद्यालयाच्या निवृत्त अधिष्ठात्या डॉ. सिंधू गणवीर आदी प्रामु‘याने उपस्थित होते. त्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व भारत माता पूजन झाले.
 
Vigyan Bharati
 
शंकरराव तत्त्ववादी म्हणाले की, नागपूरजवळचे खापरी म्हणजे (Vigyan Bharati) विज्ञान भारतीची गंगोत्री आहे. वैश्विक प्रगतीसाठी विज्ञान भारतीचे योगदान खुप महत्त्वाचे आहे. समर्पण भावनेचे विविध पैलूही त्यांनी स्पष्ट केले. सतीश वटे यांनी विज्ञान भारतीच्या कार्याची माहिती दिली. भारतीय विज्ञानाची ओळख भारतीयांना भारतीय भाषेतून व्हावी आणि त्यातून तंत्रज्ञानाचा विकास व्हावा, तरच भारत विश्वगुरू म्हणून ओळखला जाईल, असे ते म्हणाले. प्रकाश इटनकर यांनी विज्ञान भारतीचे राष्ट्रीय आयाम स्पष्ट केले. गुरुराज कुंदरगी यांनी विज्ञान भारतीच्या जिल्हानिहाय शाखा निर्मितीबद्दल विचार व्यक्त केले. डॉ. सिंधू गणवीर म्हणाल्या की, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे कुतुहल किंवा जिज्ञासा वाढवण्यासाठी विज्ञान भारती मोलाचे कार्य करीत आहे.
 
 
व्हीएनआयटीचे प्रशिक्षण व रोजगार अधिष्ठाता किशोर भुरचुंडी यांनी कुतुहल प्रदर्शन, स्पेस ऑन व्हिल, अटर टिकरिंग लॅब, प्रगती प्रकल्प, (Vigyan Bharati) विज्ञान संस्कार शिबिर, विज्ञान संस्कृती संगम व्या‘यानमाला, विज्ञान मेळा, विद्यार्थी विज्ञान मंथन या विज्ञान भारतीच्या उपक्रमांची माहिती दिली. प्रद्युम्न सौचे यांचेही भाषण झाले. संचालन मनीषा घारे, आभार प्रदर्शन नरेंद्र सातफळे यांनी केले. नरेश चाफेकर यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
Powered By Sangraha 9.0