राळेगाव मतदारसंघाच्या विकासाकरिता मी कटिबद्ध

आमदार डॉ. अशोक उईके यांचे अभिवचन

    दिनांक :30-Oct-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा
राळेगाव
Dr.Ashok Uike राळेगाव हा आदिवासींकरिता आरक्षित असलेला विधानसभा मतदारसंघ आहे. राळेगाव, कळंब, बाभुळगाव व रुंझा सर्कल अशी या मतदारसंघाची रचना आहे. आदिवासीबहुल असणार्‍या या मतदारसंघात मागील नऊ वर्षार्ंत मोठ्या प्रमाणात विकासात्मक कामे झालेली आहेत. सामान्य माणूस हा माझ्या विकासाचा केंद्रबिंदू असून मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाकरिता मी कटीबद्ध आहे, असे अभिवचन आमदार डॉ. अशोक उईके यांनी दिले.
 

अशोक उके  
 
रावेरी येथे आयोजित भारतीय जनता पार्टीच्या नवनिर्वाचित जिल्हा पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य यांच्या सत्कार समारोहात ते बोलत होते. भाजपाचा प्रत्येक पदाधिकारी, बुथप्रमुख, कार्यकर्ता पक्षाच्या कामात स्वत:ला झोकून काम करतो तो पक्षाकरिता तेवढाच महत्वाचा आहे, असेही ते म्हणाले.जिल्हा महामंत्री अ‍ॅड. प्रफुल चौहान, प्रकाश भूमकाळे, अनिल राजूरकर, चित्तरंजन कोल्हे, तालुका अध्यक्ष सतीश मानलवार, कैलास बोंद्रे, आनंद वैद्य, संदीप वैद्य, कुणाल भोयर, अनिकेत पोहेकर कार्यक‘माला उपस्थित होते.मतदारसंघातील गाव पोड तांडा वस्ती मंदिर परिसराच्या विकासापासून शहराच्या विकासाकरिता महाराष्ट्र शासनाच्या युती सरकारने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे.Dr.Ashok Uike करोडो रुपयांच्या निधीतून विकासात्मक कामे पूर्ण झाली असून रस्त्याची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत, असे आ. डॉ. अशो उईके यांनी सांगितले.सध्याचे सरकार विकासाचे राजकारण करते. मतदारसंघातील प्रत्येक गावात जल जीवन मिशन अंतर्गत प्रत्येकाला घरापर्यंत पाणी मिळण्याची सोय शासनाने उपलब्ध करून दिली आहे. यासाठी कुठेही निधीची कमतरता पडलेली नाही. प्रत्येक समाजासाठी सामाजिक भवनांची निर्मिती आमदारनिधीमधून करून दिली आहे, असे ते म्हणाले.मतदारसंघातील मु‘य रस्ते गाव खेड्यातील रस्त्यांची कामे सुरू आहेत. सर्वसामान्य माणसाला येण्याजाण्यासाठी त्रास होऊ नये याकरिता रस्त्यांची कामे चांगल्या पद्धतीने सुरू आहेत. प्रत्येक शेतकर्‍याच्या शेतास पाणी मिळावे, त्याच्या उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी अजून काही प्रकल्प राबवता येईल का, याही दृष्टीने लक्ष देणे सुरू आहे.मतदारसंघात विजेचा प्रश्न गंभीर आहे. याबाबत राज्याचे ऊर्जामंत्री यांच्याशी चर्चा करून प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहोत. कारण शेतकर्‍यांना शेतीसाठी 24 तास विजेची गरज आहे, ही बाब वरिष्ठांंच्या नजरेत आणून देणार आहे. देवधरी येथे एक सुसज्ज अशी सूतगिरणी उभी करून सर्वसामान्यांच्या मुलांच्या हाताला काम देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपण केला होता, असे ते म्हणाले.परंतु विरोधकांना बेरोजगारी वाढवायची आहे. क्रांतीसूर्य बिरसा मुंडा आदिवासी सूतगिरणीच्या कामाचा शुभारंभ झाला असताना त्यावर आक्षेप घेऊन काम थांबविले. प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. यात विरोधकांना काय मिळाले, परंतु गोरगरीब मुलांचे, शेतकर्‍यांचे मात्र नुकसान झाले, याकडेही आ. डॉ. उईके यांनी लक्ष वेधले.नवनियुक्त पदाधिकारी जिल्हा सरचिटणीस रितेश परचाके, सचिव मनोज काळे, सचिव विद्या मोहन लाड, सचिव डॉ. अजाब डाखरे, सचिव सचिन डोरलीकर, गजानन कैकाडे, अजय वाके, विशाल पंढरपुरे, जयश्री मांडवकर, दिनेश गोहने, शीला सलाम, संदीप तेलंगे, नामदेव ढोरे, राजेंद्र हारगुडे, सुभाष काकडे, विवेक अंदुरकर, वैष्णवी चिमुरकर, विलास बनकर, वीरेंद्र तोडकरी, पवन कदम, संतोष ठाकरे या सदस्यांचाही सत्कार करण्यात आला. संचालन निखिल राऊत यांनी केले.