भारत हे नावच जगण्याची प्रेरणा देते : प्रमोद बापट

30 Oct 2023 19:34:40
तभा वृत्तसेवा
वर्धा, 
Pramod Bapat शक्ती हवी असेल तर भक्ती करावीच लागेल. संतांनी समाजाला आधार दिला. संतांच्या 200-300 वर्षांच्या परंपरेतून छत्रपती शिवाजी महाराजांचा उदय झाला. समाज आत्मविश्‍वासाने जात होता. छत्रपतींच्या हाकेला प्रतिसाद मिळाला. शक्तीची पूजा भक्तीची अधिष्ठान झाले. भक्ती भारताची करायची. ‘भारत’ विसरण्यासाठी ब्रिटीशांनी अनेक प्रयत्न केले. पण, भारत हे नाव जगण्याचे प्रयोजन आणि प्रेरणा देते. वसुदैवं कुटुम्बकम् हे आमचे ब्रिद आहे. आता तर भारताच्या शब्दाला जगात मान मिळतो आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्‍चिम क्षेत्र प्रचार प्रमुख प्रमोद बापट यांनी केले.
 
 
Pramod Bapat
 
ते रविवार 29 रोजी स्थानिक केसरीमल कन्या शाळेच्या मैदानावर आयोजित वर्धा नगर विजयादशमी उत्सवात बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दत्ता मेघे अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ललिलभूषण वाघमारे उपस्थित होते. तर व्यासपीठावर सहप्रांत संघचालक चंद्रशेखर राठी, नगर संघचालक डॉ. प्रसाद देशमुख, तालुका संघचालक हिरामण पारिसे यांची उपस्थिती होती. Pramod Bapat बापट पुढे म्हणाले की, विजयादशमी हा शस्त्र पूजनाचा आणि शक्तंीच्या आराधनेचा दिवस आहे. संघ शस्त्र पूजक असल्याचा आरोप केल्या जातो. आम्ही शक्ती आणि शस्त्राची पूजा करतो. आसुरी शक्तीला मारण्यासाठी ही उपासणा करावी लागते. मांगल्याचे राज्य निर्माण करणारी ती शक्ती आहे. शक्ती तुमचे अस्तित्व ठरवत असते.
 
शक्तीचा जागर झाला त्यातून छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य उभे झाले. शक्तीची सामूहिक उपासणा व्हावी, सामूहिक शक्ती साधना व्हावी हे शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवले. त्यापूर्वी डच, फे्रन्च, ब्रिटीश, पोर्तुगिज आले. प्रत्येकाने देशाचे तुकडे करण्याचा प्रयत्न केला. इंग्रजांनी तर विषवल्ली पेरली. आमच्या भूमीविषयी नकारात्मक भाव निर्माण झाला. अशावेळी मातृभक्तीचा वारसा पुढे जावा त्याचे आंदोलन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केले. संघ समाजाचं संघटन आहे. स्वयंसेवकांचं नाही. मांगल्य निर्माण करणार्‍या शक्तीची पूजा करत संघ पुढे आला आहे. संघाचं जाळं तयार झालं ही एक शक्ती आहे, असे ते म्हणाले.
 
आज भारत महासत्ता बनते आहे. आज चंद्रावर, दक्षिण धृवावर यान गेलं ही भारतची शक्ती आहे. आता भारताची प्रतिभा शाश्‍वत करायची असेल तर संकल्प करावा लागेल, असे आवाहन करून विजयाचे उद्दीष्ट भारत माता की जय असल्याचे प्रमोद बापट म्हणाले. प्रमुख पाहुणे डॉ. वाघमारे यांनी गेल्या 5-6 वर्षात देशात आत्मविश्‍वास वाढल्याचे सांगून नवीन शैक्षणिक धोरणाचे परिणाम लगतच्या भविष्यात दिसु लागतील, असा विश्‍वास व्यक्त केला. नगर संघचालक डॉ. प्रसाद देशमुख यांनी प्रास्ताविक, पाहुण्यांचा परिचय करून दिला. यावेळी कवायत, सांघिक गीत, सुभाषित, अमृत वचन, वैयक्तिक गीत सादर करण्यात आले. कार्यक्रमाला खा. रामदास तडस, भाजपाचे जिल्हाध्यक्ष सुनील गफाट, आ. डॉ. पंकज भोयर, अरुण काशीकर आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
Powered By Sangraha 9.0