विरोधकांचे आरोप खोडसाळ : अश्विनी वैष्णव

    दिनांक :31-Oct-2023
Total Views |
नवी दिल्ली, 
टेलिफोन टॅपिंगच्या मुद्यावरून विरोधकांनी केलेले आरोप पूर्णपणे खोडसाळ आणि निराधार आहेत. देशात आमच्या विरोधकांची संख्या कमी नाही, आमच्यावर कोणत्याही मुद्यावरून आरोप करायची त्यांची सवय आहे. देशाची प्रगती त्यांना सहन होत नाही, त्यामुळे कोणताही मुद्दा नसला की टेलिफोन टॅगिंच्या मुद्यावरून आरोप केले जातात, असा पलटवार माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री Ashwini Vaishnav अश्विनी वैष्णव यांनी केला.
 
 
Ashwini Vaishnav
 
टेलिफोन टॅपिंगच्या मुद्यावरून राहुल गांधींसह विरोधी पक्षांच्या काही नेत्यांनी केलेल्या आरोपांचे खंडन करताना Ashwini Vaishnav वैष्णव म्हणाले की, जेव्हा आरोप करायला कोणताही मुद्दा नसतो, तेव्हा टेलिफोन टॅपिंगचा मुद्दा उपस्थित केला जातो. याआधीही असा आरोप करण्यात आला होता. त्यावेळीही आम्ही या आरोपांची चौकशी न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी केली होती, त्यात काहीच सापडले नाही. माझ्या मुलांचे फोनही टॅप होत असल्याचा आरोप प्रियांका वढेरा यांनी केला होता. त्या प्रकरणाच्या चौकशीतही काही आढळले नाही.
 
 
देशातील लोकांची सुरक्षा आणि गोपनीयतेच्या मुद्यावर सरकार अतिशय गंभीर आहे. अ‍ॅपलकडून जे तथाकथित संदेश काही खासदारांच्या मोबाईलवर आले, त्याची आम्ही गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाच्या खोलात आम्ही जाऊ, सखोल चौकशी करू, चौकशीत सहभागी होण्याबाबत आम्ही अ‍ॅपल कंपनीला म्हटले आहे.