आज ‘मेरी माटी मेरा देश’ अभियानाच्या कलश यात्रांचा समारोप

31 Oct 2023 08:00:28
तभा वृत्तसेवा
नवी दिल्ली, 
Meri Mati Mera Desh : ‘मेरी माटी मेरा देश’ अभियानांतर्गत काढण्यात आलेल्या अमृतकलश यात्रांचा समारोप मंगळवारी राजधानी दिल्लीत समारोप होत आहे. कर्तव्य पथवर होणार्‍या या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचा समारोपही यानिमित्ताने होणार आहे.
 
Meri Mati Mera Desh
 
अमृतवाटिका आणि अमृतमहोत्सवी स्मारकाचेही यावेळी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. (Meri Mati Mera Desh) ‘मेरा युवा भारत’ या तरुणांसाठीच्या मंचचा शुभारंभही होणार आहे. देशभरातून अमृतकलश घेऊन आलेल्या युवकांनाही मोदी संबोधित करणार आहेत. स्वातंत्र्य लढ्यात देशासाठी सर्वोच्च बलिदान करणार्‍या अनाम वीर आणि वीरांगनांना अभिवादत करण्यासाठी देशभर ‘मेरी माटी मेरा देश’ (Meri Mati Mera Desh) अभियान राबवण्यात आले. यानिमित्त तालुकास्तरावरील गावापासून देशाच्या राजधानीपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या अभियानांतर्गत देशभर अशा वीरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांचे स्मारक उभारण्यात आले. लोकांना पंचप्राण प्रतिज्ञा देण्यात आल्या, स्वदेशी प्रजातीच्या रोपट्यांचे वृक्षारोपण करण्यात आले, अमृतवाटिका (वसुधावंदन) विकसित करण्यात आली.
 
 
देशातील 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात 2 लाख 30 हजार स्मारके उभारण्यात आली. 4 कोटी पंचप्राण प्रतिज्ञा सेल्फी अपलोड करण्यात आल्या, ‘वीरोंका वंदन’चे दोन लाखावर कार्यक्रम घेण्यात आले, 2 कोटी 36 लाख स्वदेशी रोपट्यांचे वृक्षारोपण करण्यात आले त्याचप्रमाणे वसुधावंदनच्या संकल्पनेवर देशात 2 लाख 63 हजार अमृतवाटिका विकसित करण्यात आल्या. (Meri Mati Mera Desh) अमृतकलश यात्रेंतर्गत देशभरातील सहा लाख गावातून माती आणि तांदुळ एकत्र करण्यात आले. गावातील माती जिल्ह्यात आणि जिल्ह्यातील माती राज्याच्या राजधानीत पाठवण्यात आली. राज्यांच्या राजधानीतून ही माती अमृतकलश यात्रांमधून देशाच्या राजधानीत आणण्यात आली. कर्तव्य पथवर अमृतवाटिका आणि अमृतमहोत्सव स्मारक उभारण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0