मालेगावात आढळला प्रतिबंधित गुटखा

31 Oct 2023 17:35:00
मालेगाव,
gutkha शहरातील माऊली डेली नीड्स अ‍ॅन्ड शर्मा एजन्सी मेन रोड मालेगाव या दुकानात प्रतिबंधित अन्नपदार्थ आढळून आल्याने दुकानचालक संतोष बाबूलाल शर्मा (वय ५५) राहणार मालेगाव याचे विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून, मालेगाव पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
 

gutkha 
 
फिर्यादी मोहम्मद फरीद अब्दुल रशीद सिद्धीकी (वय ३७) अन्नसुरक्षा अधिकारी सिव्हिल लाईन अकोला यांनी मालेगाव पोलिस स्टेशनला ३१ ऑटोबर २०२३ रोजी दिलेल्या फिर्यादीनुसार ३० ऑटोबर २०२३ रोजी शहरातील माऊली डेली नीड्स अ‍ॅन्ड शर्मा एजन्सीज मेन रोड, डॉ. जोगदंड चौक मालेगाव या दुकानात प्रतिबंधित अन्नपदार्थ साठवून ठेवल्याची गुप्त माहिती मिळाली त्यावरून फिर्यादी व त्यांचे वरिष्ठ अधिकारी बी. के. चव्हाण सहाय्यक आयुक्त (अन्न ) वाशीम यांनी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास पंच व साक्षीदार यांच्या समवेत माऊली डेली नीड्स या दुकानावर जाऊन शासकीय ओळखपत्र दाखवून माजी अन्न सुरक्षा अधिकारी श्री चव्हाण यांची व साक्षीदाराची ओळख करून दिली. हजर व्यक्ती व त्यांची साक्षीदारासमवेत तपासणी केली असता दुकानात प्रतिबंधित अन्नपदार्थाचा साठा आढळला. त्यामध्ये नजर प्रीमियम गुटखा ,वाह पान मसाला, बाजीराव गोल्ड पान मसाला, डब्ल्यू सुगंधित तंबाखू, केशरीयुक्त विमल पान मसाला, व्ही. वन. सुगंधित तंबाखू, पानबहार पान मसाला, विमल पान मसाला, वी. वन. सुगंधित तंबाखू, विमल पान मसाला, वी. वन. सुगंधित तंबाखू, राजविलास पानमसाला व प्रीमियम झेड एल. झिरो. वन हा प्रतिबंधीत माल आढळून आला.सदर साठ्याची मोजणी केली असता सदर मुद्देमालाची एकूण किंमत ८५ हजार ५७० रुपये इतकी आहे.gutkha सदर माल फिर्यादी सोबत पोलिस स्टेशन मालेगाव येथे जमा करण्यात आला आहे. अशा प्रकारच्या लेखी रिपोर्ट वरून संतोष बाबूलाल शर्मा याचे विरुद्ध कलम ३२८, २७३ ,१८८ भादवी सह कलम ५९ अन्नसुरक्षा व मानके अधिनियम २००६ यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला ताब्यात घेण्यात आले. सदर घटनेचा तपास ठाणेदार आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि इंगळे यांच्याकडे देण्यात आला आहे.
Powered By Sangraha 9.0