सहा मालगुजारी तलावांचा होणार कायापालट

31 Oct 2023 16:44:11
गोंदिया, 
जिल्ह्यातील सडक अर्जुनी व मोरगाव अर्जुनी तालुक्यातील माजी मालगुजारी तलावांची दुरुस्थी व खोलीकरण व्हावे अशी मागणी दोन्ही तालुक्यातील नागरिकांची होती. त्या मागणीला अनुसरून पाटबंधारे विभागानी प्रस्ताव तयार केले. या प्रस्तावांना मंजुरी मिळावी म्हणून माजी आमदार राजेंद्र जैन व जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर यांनी हा विषय खा. प्रफुल्ल पटेल यांच्या निदर्शनास आणून दिला. खा. प्रफुल्ल पटेल यांनी राज्याचे वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे याविषयी चर्चा करुन मागणीचे गांभीर्य लक्षात आणून दिले. दरम्यान वित्तमंत्री अजितदादा पवार यांनी विदर्भ पाटबंधारे विकास मंडळाचे कार्यकारी संचालकाशी चर्चा करून सदर कामांना तातडीने मंजुरी प्रदान करावी असे निर्देश दिले.
 
 
sd34545
 
त्याला अनुसरून विदर्भ विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक यांनी सुमारे 5 कोटी खर्चाचे तलावांच्या दुरुस्तीला व खोलीकरणाच्या कामाला नुकतीच मंजुरी प्रदान केली. यात मोरगाव 95 लक्ष रुपये, खाडीपार 59 लक्ष रुपये, खोडशिवानी 101 लक्ष रुपये, मालिजंगा 78 लक्ष रुपये, गिरोला 72 लक्ष रुपये व कोसमतोंडी 110 लक्ष रुपये या प्रमाणे निधी मंजूर करून तातडीने कामे पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या माजी मालजुगारी तलावांच्या दुरुस्ती व खोलीकरणाच्या कामाला मंजुरी मिळाल्याने या तलावांच्या लाभ क्षेत्रातील शेतकर्‍यांनी खा. प्रफुल्ल पटेल, ना. अजित पवार, राजेंद्र जैन, गंगाधर परशुरामकर यांचे आभार मानले आहेत.
Powered By Sangraha 9.0