मुद्दे नसतात त्यावेळी होतात असे आरोप

    दिनांक :31-Oct-2023
Total Views |
- विरोधकांना केंद्राचे उत्तर
 
नवी दिल्ली, 
केंद्र सरकार पाळत ठेवत असल्याच्या आरोपांवर मंगळवारी केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती Technology Minister Ashwini Vaishnav तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी उत्तर दिले. विरोधकांकडे कोणतेही मुद्दे नसतात, त्यावेळी ते पाळत ठेवल्याचा आरोप करतात. विरोधकांनी केलेले आरोप निराधार आहेत. काही जणांना टीका करण्याची जास्तच सवय लागली असल्याचे अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.
 

Technology Minister Ashwini Vaishnav 
 
यापूर्वी कित्येकदा पाळत ठेवण्याचे आरोप झाले आहेत. काही वर्षांपूर्वी विरोधकांनी असाच प्रयत्न केला होता. त्यावेळी न्यायालयाच्या देखरेखीखाली आम्ही संपूर्ण तपास केला. मात्र, त्यात कोणतेही तथ्य आढळले नव्हते. आमच्या मुलांचेही फोन हॅक करण्यात आले, असा खालच्या पातळीचा आरोप प्रियांका वढेरा यांनी केला होता. ही खोटी माहिती विरोधकांनी पसरवली होती, असे वैष्णव म्हणाले.
अ‍ॅपलकडून इशारा आला असल्याचा मुद्दा काही खासदारांनी उचलला आहे. सरकार या मुद्यावर गंभीर आहे. आम्ही याच्या मुळाशी जाऊ. याबाबत चौकशीचा आदेश देण्यात आला आहे. काही जणांना टीका करण्याची सवय लागली आहे. या लोकांना देशाची प्रगती सहन होत नाही. अ‍ॅपलने 150 देशांमध्ये अशा प्रकारची सूचना जारी केली होती. याबाबत अ‍ॅपलकडे कोणतीही माहिती नाही. त्यांनी अंदाजाच्या आधारे ही सूचना पाठवली होती, असे Technology Minister Ashwini Vaishnav वैष्णव यांनी सांगितले.