गोंदियात भीषण अपघात...भरधाव ट्रकने तिघांना चिरडले

    दिनांक :31-Oct-2023
Total Views |

gondiya
 
गोंदिया,
accident in Gondia रस्त्याच्या कडेला दुरुस्तीसाठी उभा केलेल्या ट्रकला भरधाव येणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने उभ्या असलेल्या ट्रकचे दोन चालक आणि वाहक अशा तिघांचा घटनास्थळीची मृत्यू झाल्याची घटना आज मंगळवार ३१ ऑक्टोबर रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास मुंबई-कोलकत्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर देवरी पोलिस ठाणे अंतर्गत येणाऱ्या धोबीसराड गावाजवळ घडली. चालक रोशन भीमराव सोनुने (३५), वाहक प्रमोद नामदेवराव इंगळे (४०) दोघे रा. टाकळी जहागीर ता. जि. अमरावती, चालक अनवरखान अशरफ खान पठाण (२६) रा. दूसरबीड ता. सिंदखेड राजा जि. बुलडाणा अशी अपघातातील मृतकांची नावे आहेत.