वारकरी संप्रदायाचे महामेरू, रत्न बाबा महाराज सातारकर यांना श्रध्दांजली

    दिनांक :31-Oct-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा
दारव्हा, 
Baba Maharaj : बाबा महाराज सातारकर यांच्या श्रद्धांजलीचा कार्यक‘म अंबादेवी संस्थान जुना दिग‘स रोड दारव्हा येथे पार पडला. यावेळी अनेक मान्यवरांनी श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त केले. वारकरी संप्रदायाला जगाच्या पाठीवर तोड नाही. बाबा महाराज सातारकर वारकरी संप्रदायातले पहिले संत आहेत की ज्यांना शासकीय इतमामात अंतिम संस्काराचा मान मिळाला. हे वारकरी संप्रदायासाठी स्वाभिमान आहे, गर्वाची गोष्ट आहे. तरी या विचाराची कार्याची वारकरी संप्रदायाने जाणीव ठेवावी, असे मनोगत व्यक्त केले.
 
Baba Maharaj
 
कार्यक‘मांमध्ये उपस्थित गुलाब राऊत, मोरेश्वर गोरे, श्याम भानावत, विष्णू सरतापे, संतोष शेंदुरकर, राजेंद्र आकोटकर, प्रा. राजेंद्र ठाकूर, राजेंद्र चिंतकुटलवार, धुमाळे, चौधरी पाटील, मनोहर नवरंगे, मोहन चवरडोल, नांदेकर, सुदाम उघडे, सोनवणे, मात्रे, काशीकर, विजय गव्हाणे, हार्मोनियम वादक पुरुषोत्तम काळबांडे, तबलावादक धर्मराज शिंदे उपस्थित होते.
कार्यक‘माचे सूत्रसंचालन सरागे यांनी केले. Baba Maharaj आभारप्रदर्शन मुकेश चुडे यांनी केले.