संघशक्तीच्या विचार सरणीने भारत विश्वगुरु होईल:गणेश शेटे

31 Oct 2023 18:06:03
मंगरुळनाथ, 
Ganesh Shete राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सामाजिक सेवेत अग्रेसर असून, संघाची वाटचाल शताब्दी कडे सुरु आहे. ९९ वर्षे संघ स्थापनेला पुर्ण झाली आहेत. शाखाचे जाळे देशातील प्रत्येक गावात असून, अविरत सेवाकार्य सुरु आहे. संकट काळी संघाचे स्वयंसेवक मदतीसाठी धाव घेतात. हे ईश्वरी कार्य अनेक वर्षापासुन सुरु आहे. संस्थापक डॉ. हेडगेवार यांनी लावलेल्या लहानशा वृक्षाचे विशाल रुप झालेले आपण आज पाहत आहोत. संघ शक्तीच्या विचारसरणीने भारत देश हा विश्वगुरु होईल, असे प्रतिपादन कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रांत प्रचारक गणेश शेटे यांनी मंगरुळनाथ येथील आयोजित विजयादशमी उत्सवा प्रसंगी केले.
 

ganesh shete 
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मंगरुळनाथ शाखेचा विजयादशमी व शस्त्रपुजन उत्सव २९ऑटोबर रोजी श्री चारभुजानाथ मंदीर देवकीभवन येथे संध्याकाळी ६.३० वाजता हर्षोल्हासात संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून प्रांत प्रचारक गणेश शेटे व प्रमुख अतिथी म्हणुन शासकीय कंत्राटदार सतिश बियाणी यांची व मंगरुळनाथ तालुकासंघ चालक कीशोर घोडचर यांची उपस्थिती होती. सुरुवातीला देवकीभवन येथे शाखा लावण्यात आली. तद्नंतर गणवेशधारी स्वयंसेवकांचे पथसंचलन घोष वाद्यासह नगरातील श्री चारभुजानाथ मंदीर देवकी भवन येथून काढण्यात आले. पथसंचलनाच्या मार्गात सर्व चौकात संघ प्रेमी महीला पुरुष, दुर्गावाहीनीच्या दुर्गा, राष्ट्र सेविका समितीच्या महीला कार्यकर्त्या, विश्व हिंदु परिषद व बजरंग दलाचे कार्यकर्ते आदीसह शहरातील संघप्रेमी नागरिकांनी गणवेशधारी स्वयं सेवकावर फुलांचा वर्षाव केला.पुढे बोलतांना गणेश शेटे म्हणाले की, नवरात्रांचे दिवस म्हणजे शक्ती पर्व होय. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यापूढ ठेऊन या पर्वात संघटीत समाज निर्माण करायचा आहे. आपण संघटीत राहिल्यामुळे आपला भारत देश विश्वगुरु बनण्याच्या दिशेने पाऊल टाकत आहे. त्याचे उदहाहरण म्हणजे नुकतेच जी ट्वेटींचे यशस्वी अयोजन, चंद्रयानचे यशस्वी प्रक्षेपण आणि आपल्या आस्थेचे प्रतीक असलेले प्रभु श्रीराम मंदीराची उभारणी, असेही ते म्हणाले. अध्यक्षीय भाषणात सतिश बियाणी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या देश हिताच्या कार्यप्रणालीची प्रशंसा केली व संघाच्या सेवा कार्याचा स्वत:ला आलेला अनुभव सांगितला.कार्यक्रमाच्या सुरुवातीला सुभाषित जयेश रघुवंशी, अमृतवचन शुभम ठाकरे, वैयत्तिक गीत ऋषिकेश महाजन, सांघिक गीत राहुल घोडचर यांनी गायिले. यावेळी संघ स्वयंसेवकांनी व्यायाम योग व प्रात्याक्षिके सादर केली. प्रास्ताविक व आभार प्रदर्शन नगर संघचालक प्रफुल्ल रघुवंशी यांनी केले. यावेळी तेजस कांत, अमीत रघुवंशी, सुनील सपकाळ, मनोहर काळे, संजय टोंचन, संजय बावने, मुकूंद दंडे आदीसह संघ पदाधिकारी, संघप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संघ कार्यकर्ते, विश्व हिंदु परिषद, बजरंग दलाचे बजरंगी, भा.ज.पा.चे पदाधिकारी व कार्यकर्ते, सेविका समिती कार्यकर्त्या दुर्गा वाहीनीच्या दुर्गा व शहरातील संघ प्रेमी नागरिकांनी सहकार्य केले.
Powered By Sangraha 9.0