तभा वृत्तसेवा
भंडारा,
district hospital केंद्र शासनाच्या आयुष्यमान भव मोहिमेंतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे स्वच्छता ही सेवा अभियान राबवून श्रमदान करण्यात आले. स्वच्छतेबाबत जागृकता निर्माण करण्यासाठी रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिपचंद सोयाम यांचा मार्गदर्शानात हा उपक्रम राबविण्यात आला.
सदर उपक्रमात अतिजिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अतुल देशमुख, डॉ.अमित पुटे, डॉ.बा.डा.नाईक, अधिपरिचारीका श्रीमती फुले, आहारतज्ञ पांडे, मुकदम मंगला ठोबरे, मनोज सोनेकर, गणेश निखाडे, विलास चोपकर, महेश पांडे, संजय हाटे व नर्सिंगच्या विद्यार्थीनींसह अ.भा. सफाई मजदूर काँग्रेस स्वतंत्र कामगार युनियनचे शहर अध्यक्ष हरिराम पांडेकर, शहर उपाध्यक्ष सोनेकर, संदिप शेंडरे, रवी सोनटक्के, मनिष मिळवे, अनूप शेंदरे, निसर्ग विकास बहु. संस्थाचे विनोद बट्टी, मनोज इळपाते, आशिष मडावी, उमेश बेरकडे, शिशुपाल भूरे, गणेश नंदनवार, राजेश कोडापे, प्रशांत मस्के आदी सहभागी झाले होते. district hospital संपूर्ण रुग्णालय परिसरात साफ सफाई झाल्यानंतर गोळा झालेला कचरा वाहून नेण्याकरिता संजय एकापूरे यांनी वाहनाची व्यवस्था करून देत श्रमदानाच्या कार्यास मोलाचे सहकार्य केले.