आरसी बुक, लायसन्सवर राहणार क्यूआर कोड

    दिनांक :05-Oct-2023
Total Views |
- रक्तगटाचीही होणार नोंद
- नवे आरसी बुक वितरण सुरू
 
मुंबई, 
RC Book, License : स्मार्टकार्ड वाहन परवाना व वाहन नोंदणी प्रमाणपत्र (आरसी बुक) छपाईसाठी नवीन करार करण्यात आला असून, नव्या आरसी आणि लायसन्स चिपऐवजी क्यूआर कोड आहेत व डिजिटल स्वरूपात ते उपलब्ध होणार आहेत. कार्डवर अवयवदानासह रक्तगटाचीही माहिती देण्यात येणार आहे. ऑगस्टपासून सर्व वाहनचालकांना नवीन आरसी बुक देणे सुरू झाले आहे, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत देशमुख यांनी दिली.
 
 
RC Book, License
 
नव्या रूपातील RC Book, License स्मार्ट कार्ड पुरवण्याचे कंत्राट कर्नाटकातील एमसीटी कार्ड अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी कंपनीला देण्यात आले असून, वितरण सुरू झाले आहे. स्मार्ट कार्ड निळ्या रंगाचे आहे. कार्डच्या पुढील बाजूस नाव, पत्ता, जन्मतारीख, अवयवदानासह रक्तगटाची माहिती असेल. मागील बाजूस क्यूआर कोड व कार्डच्या मुदतीसह इतर माहिती आहे. एमएच 01 ते एमएच 17 पर्यंतचे आरसी बुक मुंबईत, एमएच 18 ते एमएच 34 पर्यंतचे आरसी बुक छत्रपती संभाजीनगर येथे, तर एमएच 35 ते एमएच 51 क‘मांकांपर्यंतचे आरसी बुक नागपूर शहरात तयार होतील.