- निवडणूक आयोगात आज सुनावणी
नवी दिल्ली,
राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीसंदर्भात शुक्रवारी निवडणूक आयोगात Sharad Pawar group शरद पवार गटाकडून ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनू सिंघवी युक्तिवाद करणार आहेत. शरद पवार गटाकडून आठ ते नऊ हजार शपथपत्र दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेनेचा वाद संपूर्ण महाराष्ट्राने बघितलेला आहे आणि त्यानंतर आता उद्यापासून अजून एक वेगळी लढाई सुरू होणार आहे. उद्या दुपारी तीन वाजता निवडणूक आयोगामध्ये राकाँच्या निवडणूक चिन्हाबाबत पहिली सुनावणी होणार आहे. शरद पवार गटाकडून यासंदर्भात तयारी करण्यात आली आहे.
Sharad Pawar group शरद पवार गटाचा दावा आहे की, अजित पवार गटापेक्षा कागदपत्रांची संख्या जास्त आहे. अजित पवार गटाने सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये काही दोषही ते निवडणूक आयोगाला दाखवणार आहेत. अजित पवार गटाच्या कागदपत्रांमध्ये काही मृत व्यक्तींच्या नावेही शपथपत्र दाखल केली गेली आहेत. काही शिक्षण संस्थांचे कर्मचारी आहेत की, जे सरकारी नोकरीला आहेत त्यांचेही शपथपत्र दाखल करण्यात आल्याचा दावा शरद पवार गटाकडून करण्यात आला आहे. उद्या दुपारी होणार्या सुनावणीसाठी नेत्यांना सुनावणीसाठी उपस्थित राहण्याची गरज नाही. मुख्य नेते उपस्थित नसले, तरी दुसर्या फळीतील नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. उद्यापासून निवडणूक आयोगात सुरू होणार्या लढाईत पहिला निर्णय काय असणार, हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.