गडचिरोली,
OBC Jagar Yatra ओबीसींच्या हितासाठी व त्यांच्या न्याय मागण्यांसाठी भाजपच्या वतीने काढण्यात आलेल्या ओबीसी जागर यात्रेला यशस्वी करण्यासाठी पिपरे दाम्पत्याने मोलाचे योगदान दिले आहे. ‘ओबीसी उद्धार हाच भाजपचा निर्धार’ असा नारा देत भाजपचे ओबीसी मार्चा प्रदेश प्रभारी डॉ. आशिष देशमुख हे जागर यात्रेच्या निमित्ताने काल गडचिरोलीत आले होते.
यावेळी ओबीसी मार्चाचे प्रदेशाध्यक्ष संजय गाते, प्रदेश संपर्क प्रमुख रवींद्र चव्हाण, खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, लोकसभास समन्वयक तथा ज्येष्ठ नेते प्रमोद पिपरे, माजी नगराध्यक्ष योगीता पिपरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, महिला अधाडीच्या जिल्हाध्यक्ष गीता हिंगे, माजी नगराध्यक्ष शालू दंडवते, चांगदेव फाये आदी उपस्थित होते. भाजपच्या वतीने आयोजित ओबीसी जागर यात्रेला व ओबीसी कार्यकर्ता मेळाव्याला नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. ओबीसींच्या हितासाठी ज्येष्ठ नेते प्रमोद पिपरे सातत्याने लढा देत आले आहेत. OBC Jagar Yatra त्यांच्या न्याय मागण्या सोडविण्यासाठी भाजपच्या वतीने त्यांनी अनेकदा आंदोलने केली आहेत. या जागर यात्रेला यशस्वी करण्यासाठी पिपरे यांनी मोलाचे प्रयत्न केले.