अर्जुनी मोरगाव,
Rachna Gahane आदिवासी समाजाच्या प्रेरणास्थान राणी दुर्गावती यांचा 500 वर्षापूर्वीचा इतिहास त्याग, बलिदान व शौर्याचा आहे. राजघराण्यात जन्मलेल्या राणी दुर्गावती या सर्वच कलेत पारंगत होत्या. राजवाड्यातूनच शौर्याचे धडे मिळाल्याने त्यांनी मुघल सम‘ाटांना सळो की पळो करून ठेवले होते. आपल्या राज्यातील जनतेला समता, न्याय व बंधुत्व मिळवून देऊन प्रजेचे हित जोपासणार्या कार्यक्षम शासनकर्ती म्हणून त्या इतिहासात प्रसिद्ध ठरल्या.

5 ऑक्टोबर 1524 ला जन्मलेल्या राणी दुर्गावती या केवळ 40 वर्षे आयुष्य जगल्या. त्या त्यांच्या पराक‘मामुळे अजरामर झाल्या. महान शुरसंग्रामी राणी दुर्गावतींच्या कार्याची प्रेरणा घेऊन आदिवासी व इतर समाज बांधवांनी सत्य व न्याय व समाजाच्या प्रगतीसाठी एकजुटीने लढावे, असे आवाहन जिल्हा परिषद सदस्या रचना गहाणे यांनी केले. त्या तालुक्यातील गुढरी येथे राणी दुर्गावती यांच्या 500 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक‘मात उद्घाटीका म्हणून बोलत होत्या. कार्यक‘माच्या अध्यक्षस्थानी आदिवासी जंगल कामगार संस्थेचे अध्यक्ष वसंतराव सोरते होते. Rachna Gahane अतिथी म्हणून पंचायत समिती सदस्य पुष्पलता दृगकर, सरपंच विवेक डोंगरे, चतुर्भुज दिरबुडे, सुभाष बनसोड, गोविंदराव भांडारकर, मोहनदास खोब‘ागडे, लिलेश्वर खुणे, शालू फुंडे आदी उपस्थित होते. सर्वप्रथम राणी दुर्गावती यांचे पूर्णाकृती पुतळ्याला मल्यार्पण व दीप प्रजल्वित करून कार्यक‘माची सुरुवात करण्यात आली. यावेळी सोरते यांनी राणी दुर्गावतीच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकून आदिवासी समाज बांधवांनी त्यांचे विचारांची प्रेरणा घेऊन बलाढ्य समाज निर्माण करावा, बाबासाहेबांच्या शिका संघटित व्हा व संघर्ष करा या मूलमंत्राचा अंगीकार करण्याचे आवाहन केले. प्रसंगी इतरही मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. केशव भांडारकर, देवराव भांडारकर, मार्कंड भांडारकर, चोपराम मडावी, भोजराज बहेकार, दुर्गा कापगते, शिवकुमार रामटेके, प्रकाश बोरकर, बबन दोनोडे, सुवर्णा सरोते, किरण रामटेके यांच्यासह ग‘ापं सदस्य, समाज बांधव व ग‘ामवासी उपस्थित होते.