शिवशौर्य जागरण यात्रेचे प्रमोद पिपरे यांनी केले स्वागत

    दिनांक :06-Oct-2023
Total Views |
गडचिरोली
Shaurya Jagran Yatra शिवराज्याभिषेक 350 वर्ष पूर्ती निमित्याने विश्‍व हिंदू परिषद व बजरंग दलच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराज शौर्य जागरण यात्रेचे संपूर्ण देशभरात आयोजित करण्यात आले.
 

Shaurya jagran Yatra 
 
श्री छत्रपती शिवाजी महाराज शौर्य जागरण यात्रेचे आगमन गडचिरोली शहरांमध्ये झाले. त्यानिमित्ताने चंद्रपुर रोडवरील पिपरे पेट्रोलियम सर्व्हिसेस येथे लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे व पिपरे पेट्रोलियम सर्व्हिसेसचे संचालक अनुराग पिपरे यांनी शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून स्वागत केले.Shaurya Jagran Yatra यात्रेमध्ये शिवप्रतिष्ठान सांगलीचे प्रल्हाद पांडुरंग माने, गौरक्षक प्रफुल बिजवे, बजरंग दल जिल्हा संयोजक सचिन ठाकूर, जिल्हा मठमंदिर प्रमुख सुरज काटवे, प्रखंड मंत्री विशाल बिजवे, प्रखंड संयोजक बालाजी भांडेकर व विश्‍व हिंदू, परिषद बजरंग दल संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.