अबू आझमी यांची 150 कोटींची संपत्ती जप्त

07 Oct 2023 21:39:11
लखनौ, 
महाराष्ट्रातील सपाचे आमदार Abu Azmi property seized अबू आझमी आणि त्यांच्या साथीदारांच्या विरोधातील तपासाचा भाग म्हणून आयकर विभागाने वाराणसीतील नवीन सदनिका, इमारत आणि बँकेतील ठेवींसह 150 कोटी रुपयांची संपत्ती बेनामी मालमत्ता कायद्याच्या अंतर्गत जप्त केली, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी शनिवारी दिली.
 
 
Abu Azmi property seized
 
Abu Azmi property seized आयकर विभागाच्या बेनामी मालमत्ता तपास युनिटने या तपासाचा एक भाग म्हणून या आठवड्याच्या सुरुवातीला वाराणसी आणि महाराष्ट्राच्या काही भागांत छापेमारी सुरू केली होती. छापेमारी आता संपुष्टात आली असून, विनायक ग्रुप नावाच्या कंपनीच्या 10 कोटी रुपयांच्या बँक ठेवी, वाराणसीतील मालदहिया परिसरातील विनायक प्लाझामधील टॉवर सी आणि गंगा नदीच्या काठावर असलेल्या हमरौतिया परिसरातील वरुणा गार्डन प्रकल्पातील 45 सदनिका जप्त करण्यात आल्या, असे सूत्रांनी सांगितले. बेनामी संपत्ती व्यवहार प्रतिबंधक कायद्याच्या अन्वये ही कारवाई करण्यात आली. हमरौतिया प्रकल्पात आझमी यांच्या टू-बीएचके आणि थ्री-बीएचके सदनिका आहेत आणि त्यांचे बाजार मूल्य जवळपास 30 ते 32 कोटी रुपयांचे आहे, असे सूत्रांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0