‘आयुष्मान भारत को अपनाओ, मुफ्त ईलाज पाओ’ नार्‍यांनी शहर दुमदुमले

अवयवदानाची शपथ

    दिनांक :07-Oct-2023
Total Views |
गोंदिया, 
Ayushman Bharat : समाजातील सर्व घटकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्यासाठी तसेच आरोग्याची सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाची महत्त्वकांक्षी ’आयुष्यमान भव’ मोहीम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. यातंर्गत जिल्हा आरोग्य प्रशासनामार्फत प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. प्रभातफेरीतील ‘आयुष्मान भारत को अपनाओ, मुफ्त ईलाज पाओ’ नार्‍यांनी शहर दुमदुमले.

Ayushman Bharat
  
प्रभातफेरीला हिरवी झेंडी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांनी दिली. Ayushman Bharat यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमरीश मोहबे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिनेश सुतार, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. नितीन कापसे, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. निरंजन अग्रवाल, जिल्हा साथरोग तज्ञ डॉ. सुशांत कापसे, जिल्हा आयुष अधिकारी डॉ. मीना वट्टी, दंत व मूख रोग तज्ञ डॉ. अनिल आटे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. डी. जायस्वाल, आयुष्मान योजनेचे समन्वयक डॉ. जयंती पटले, डॉ. स्नेहा वंजारी, डॉ. सुवर्णा उपाध्याय, सपना खंडाईत, प्रज्ञा कांबळे, आशिश बल्ले उपस्थित होते. प्रसंगी डॉ. नितीन वानखेडे यांनी, मोहिमेदरम्यान आयुष्यमान आपल्या दारी, आयुष्मान मेळावा, स्वच्छ भारत अभियान, रक्तदान मोहीम, अवयव दान जनजागृती मोहिम, आयुष्मान सभा, अंगणवाडी व प्राथमिक शाळांमधील 0 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांची तपासणी, वय वर्ष 18 वरील सर्व पुरुषांची आरोग्य तपासणी त्यात निरोगी आरोग्य तरुणाईचे, वैभव महाराष्ट्राचे अभियान असे विविध उपक्रम चार महिन्यात राबविण्यात येत असल्याची माहीती दिली.
 
 
प्रभात फेरी केटीएस सामान्य रुग्णालय येथून निघून स्टेडियम मैदान, जयस्तंभ चौक भागात फिरवून विविध आजाराचे जनजागृती करण्यात आली. Ayushman Bharat प्रभातफेरीतील शासनाची निरोगी आरोग्य तरुणाईचे, वैभव महाराष्ट्राचे अभियानाचा चित्ररथ लक्षवेधी ठरली. प्रभातफेरी संपल्यानंतर अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिनेश सुतार यांनी अवयवदानाची शपथ देऊन त्याचे महत्व पटवून दिले. प्रभातफेरीत आरोग्य विभाग, केटीएस रुग्णालय, राष्ट्रीय आरोग्य अभियान, क्षयरोग विभाग, कुष्ठरोग विभाग, आयुष विभाग, हिवताप, साथरोग विभागाचे अधिकारी व कर्मचारी, नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी सहभागी झाले होते.