अदानी विद्युत प्रकल्पात फायर मॉक ड्रिल

    दिनांक :07-Oct-2023
Total Views |
गोंदिया, 
Adani Power Plant : तिरोडा येथील अदानी विद्युत प्रकल्पातील मुख्य नियंत्रण केंद्राला हायड्रोजन केमिकल प्लांटजवळ आग लागल्याची माहिती एकच धावपळ सुरु झाला. दरम्यान प्रकल्पातील सुरक्षा रक्षक, आपत्ती व्यवस्थापन व पोलिस प्रशासनाने आग वेळीच आटोक्यात आणल्याने धोका टळला. हा अनुभव प्रकल्पातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी फायर मॉक ड्रिल घेतला.
 
Adani Power Plant
 
प्रकल्पातील Adani Power Plant हायड्रोजन केमिकल प्लांट जवळ गवताळ आग लागल्याचा संदेश प्लांट मधील मुख्य नियंत्रण केंद्रात मिळाला. तातडीने हा संदेश फायर कंट्रोल रूम तसेच प्रकल्पाच्या आपत्ती नियंत्रण मुख्य अधिकार्‍यांना देण्यात आले. मोठा सायरन वाजताच कामगार अस्सेम्बली पॉईंटवर धावत पोहचले. परिस्थिती हाताळण्यासाठी तिरोडा पोलिस स्टेशनला कळवण्यात आले. तातडीने अग्निशामक दल, पोलिस अधिकारी, आपत्ती नियंत्रण अधिकारी, सुरक्षा अधिकारी, सुरक्षारक्षक, रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचले व आग आटोक्यात आणली.
 
 
या Adani Power Plant घटनेमुळे काळी काळ प्रकल्पात भीतीचे वातावरण होते. मात्र काही वेळाने प्रकल्पात आग लागल्यास ती विझवण्यासाठी असलेल्या यत्रंणेची पडताळणी घेण्यासाठी आग विझवण्याची रंगीत तालीम घेण्यात आल्याचे सांगितल्यानंतर वातावरण निवळले. मॉक ड्रिलसाठी अदानी प्रकल्पाचे मुख्य अधिकारी कांती बिस्वास, मेन्टेनन्स हेड श्रीराम पिंपळीकर, पोलिस अधिकारी देविदास कठाडे, सेक्युरिटी अधिकारी राजेंद्र मुरारी, सुरक्षा अधिकारी शशिकांत बोधनकर, फायर विभागाचे मुदित खरे, विकास वर्मा, सुहास वाकोडकर, संतोष शर्मा, धीरज शिंदे यांनी पुढाकार घेतला.