- दीड वर्षांपासून चळवळ सक्रिय
लंडन,
येथील शीख रेस्टॉरेंंटचे मालक Harman Singh Kapoor हरमन सिंग कपूर यांच्या कारची खलिस्तान समर्थकांनी तोडफोड करून त्यांना बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओही व्हायरल झाला होता. या प्रकरणी हरमन सिंग कपूरची प्रतिक्रिया समोर आली आहे. मी 26 वर्षांपासून लंडनमध्ये राहत आहे. बि‘टनमध्ये गत दीड वर्षात खलिस्तानी चळवळ सक्रिय झाली आहे. यावर मी एक व्हिडीओ पोस्ट केला, जो व्हायरल झाला. मला गत नऊ महिन्यांपासून धमक्या येत आहेत. माझ्यावरही हल्ला झाला. मला धमकी देणार्या लोकांची इच्छा आहे की मी हा व्हिडीओ हटवावा आणि त्यांची माफी मागावी, पण मी तसे करण्यास नकार दिला, असे हरमन सिंग कपूर यांनी सांगितले.
मी लंडनमध्ये राहत होतो, त्यामुळे मला वाटत होते की मी सुरक्षित आहे, पण माझी चूक होती. गुन्हेगारांनी माझा मानसिक छळ केला, ऑनलाईन धमक्या दिल्या आणि 25 फेब‘ुवारी 2023 रोजी माझ्यावर हल्ला केला, असे त्यांनी सांगितले. माझ्यावर हल्ला करण्यासाठी आलेले लोक शीख होते. ते शीख, हिंदू व भारताची बदनामी करीत आहेत. मला हा लढा संपवायचा आहे, असे Harman Singh Kapoor हरमन सिंग कपूर म्हणाले. अधिकार्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. त्यांनी केवळ माझी तक्रार नोंदवली. खलिस्तानी येथे मुक्तपणे फिरत आहेत. त्याला पोलिसांचा पाठिंबा आहे. त्यामुळे त्याला अटक होत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. खलिस्तान्यांना इंग्लंडमध्ये पोलिसांचा पाठिंबा आहे, असा आरोपही त्यांनी केला.
अलिकडेच लंडनमध्ये भारतीय उच्चायुक्त कार्यालयाच्या बाहेर खलिस्तानी समर्थकांनी जोरदार विरोध प्रदर्शन केले. त्यामुळे कार्यालयाच्या बाहेर ब्रिटिश सुरक्षा बलाचे जवान तैनात करण्यात आले. तसेच स्कॉटलंडमध्ये खलिस्तानी समर्थकांनी भारतीय उच्चायुक्तांना गुरुद्वारात प्रवेश करण्यापासून रोखले व त्यानंतर त्यांच्या कारला घेराव घातल्याचे वृत्त आहे.