अमेरिकेतील सौदर्य स्पर्धेत शीतलला विजेता मुकूट

    दिनांक :07-Oct-2023
Total Views |
गोंदिया,
Sheetal Doye winner : अमेरिकेत प्रतिष्ठीत समजली जाणारी ‘मिसेस भारत एलिट कॅलिफोनिर्या’ या सौंदर्य स्पर्धेचा विजेतपदाचा मुकूट स्थानिक शीतल डोये हिला मिळाला. अमेरिकेतील माय ड्रिम टीव्हीद्वारे आयोजीत या स्पर्धेत शितलने केवळ सौंदर्यच नाही तर तिची प्रतिभा, बुद्धिमत्ता आणि समर्पण देखील प्रदर्शित केले.
 
Sheetal Doye winner
 
शितलने (Sheetal Doye winner) इलेट्रॉनिक्स आणि टेलिकम्यूनिकेशनमध्ये बीटेक केले आहे. तिचे लग्न अमित भोसले यांचेशी झालेले असून ती गोंदिया येथील राजेंद्र व सिमा डोये यांची मुलगी आहे. शितल 2016 मध्ये अमेरिकेतील एयेथे येथे स्थायिक झाली. ती एक उत्कृष्ट चित्रकार, नृत्यांगना आणि फिटनेस तज्ञ आहे. विजेतेपदाचा मुकूट जिंकल्यावर तिने सांगितले, ही स्पर्धा एक मुकुटापेक्षा अधिक आहे. माझ्या आयुष्यातील नवीन आणि आनंददायी प्रवासासाठी हा एक पायरीया दगड आहे. या प्लॅटफॉर्मचा वापर प्रेरणा देण्यासाठी आणि फिटनेस व फॅशन या दोन्हीचा समतोल राखणार्‍या जीवनशैलीला प्रोत्साहन देण्यासाठी करण्यास उत्सुक आहे.