सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल पूर्ण क्षमतेने सुरू करणार

-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही
-अकोल्यात महाआरोग्य शिबिराचा शुभारंभ

    दिनांक :08-Oct-2023
Total Views |
अकोला,
Devendra Fadnavis : आरोग्य संस्थांच्या बळकटीकरणासाठी राज्य शासनाने मोठा निधी उपलब्ध करून दिला असून, अकोला येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात येईल. गरजूंना आवश्यक उपचार मिळवून देण्यासाठी निधीची उणीव पडू देणार नाही, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवार, 7 ऑक्टोबर रोजी येथे दिली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रूग्णालय येथे दोनदिवसीय महाआरोग्य शिबिराचा शुभारंभ, सुपर स्पेशालिटी रूग्णालयाच्या नूतन इमारतीचे लोकार्पण तसेच शिवापूर येथील उपजिल्हा रूग्णालयाचे व बोरगाव मंजू येथील ग्रामीण रूग्णालयाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.
 
Devendra Fadnavis
 
महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, अभ्यागत समितीचे अध्यक्ष तथा आमदार रणधीर सावरकर, आमदार वसंत खंडेलवाल, जि. प. अध्यक्ष संगीता अढाऊ, विभागीय आयुक्त डॉ. निधी पांडेय, जिल्हाधिकारी अजित कुंभार, वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये, आ. लखन मलिक, किशोर मांगटे पाटील, जयंत मसने, अनुप धोत्रे, अनुप शर्मा, जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. गाढवे, सागर शेगोकार, देवाशिष काकड, माधव मानकर, संजय गोटफोडे आदी मंचावर आदी उपस्थित होते.
 
 
कोरोना संकटानंतर आरोग्ययंत्रणेत सुधारणेची गरज लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात अडीच लाख आरोग्य केंद्रे निर्माण करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी राज्यांना निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे 14 जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय निर्माण होत आहे. त्याचप्रमाणे, इतर जिल्ह्यातील पूर्वीच्या महाविद्यालयांचे आधुनिकीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे असे या प्रसंगी (Devendra Fadnavis) उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
 
 
अकोला येथील रूग्णालयात वॉर्डांसाठी 65 कोटी व बाह्य रूग्ण विभागाासाठी 85 कोटी निधी देण्यात आला. त्याचप्रमाणे, रूग्णालयांच्या दीर्घकालीन विकासासाठी 950 कोटी रू. च्या निधीचे प्रस्ताव केंद्र शासनाकडे दाखल करण्यात येत आहेत. अतिविशेषोचार रूग्णालयासाठी केंद्र शासनाने 120 कोटी व राज्य शासनाने 40 कोटी रु. निधी दिला. प्रधानमंत्री जनविकास योजनेतून 46 कोटी रू. निधीतून 100 खाटांचे शिवापूर येथे उपजिल्हा रूग्णालय, तसेच बोरगाव मंजू येथे ग्रामीण रूग्णालय निर्माण होणार आहे. सर्वोपचार रूग्णालयालाही निधी मिळवून दिला जाईल असेही त्यांनी (Devendra Fadnavis) यावेळी स्पष्ट केले.
 
 
ते पुढे म्हणाले की, या शिबिरातील एकही रूग्ण उपचारांविना परत जाणार नाही. गरजूंना शस्त्रक्रियेपर्यंतचे आवश्यक उपचार गरज पडल्यास खासगी रूग्णालयांतूनही मिळवून देऊ. महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून पाच लाखांपर्यंत विनामूल्य उपचार सर्वांना लागू करण्यात आले आहेत. श्री राजराजेश्वर मंदिराला पर्यटनस्थळाचा दर्जा देऊन निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही त्यांनी (Devendra Fadnavis) या प्रसंगी दिली.
 
 
नांदेड येथील घटना दु:खद
नांदेड येथील घटना दुखदायी असून रुग्णालयात औषधे उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून 10 टक्के निधी राखीव ठेवण्यात आला आहे. तसेच विरोधकांनी आरोग्य सेवेला व सेवा देणार्‍यांना बदनाम करून त्यांना नाउमेद करण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन या प्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. विदर्भाची पंढरी असलेल्या संत गजानन महाराज संस्थेचे निळूभाऊ पाटील यांनी 20 हजार रुग्णांच्या भोजनाची उत्तम व्यवस्था येथे केली.
 
 
शहरात इलेक्ट्रिक बस सुरू करणार
आपण जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सोडले तरी ‘पालकत्व’ सोडलेले नाही, अशी ग्वाही देऊन ते म्हणाले की, अकोला शहरासाठी वाढीव पाणीपुरवठ्यासाठी जिगाव प्रकल्पातून 32 दलघमी पाणी मिळण्याची तरतूद करण्यात आली आहे. अटल अमृत योजनेत 921 कोटी, तसेच मलनि:स्सारण 1 हजार 674 कोटी रू. निधी मंजूर करण्यात आला आहे. प्रधानमंत्री ई-बस योजनेत शहरात इलेक्ट्रिक बसही सुरू होणार आहेत. ग्रामसडक योजनेत 160 कोटी रू. निधीतून 200 किमी रस्ते बांधण्यात येणार आहेत. 36 रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत असे यावेळी (Devendra Fadnavis) उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.