नवी दिल्ली,
BJP Sarkar : निवडणूक आयोगाने पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या घोषणांचे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी स्वागत केले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात या पाचही राज्यांमध्ये भाजपा मोठ्या बहुमतासह सरकार स्थापन करेल, असा विश्वास व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सर्वच राज्यांमध्ये (BJP Sarkar) भाजपा सरकार स्थापन करेल आणि लोकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी पुढील पाच वर्षे आम्ही वचनबद्धतेने काम करू, असे त्यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.