वाशीम,
Dhadak campaign जिल्ह्यात आयुष्मान भव या उपक्रमांतर्गत आभा व गोल्डन कार्ड काढण्यापासून वंचित राहिलेल्या लाभार्थ्यांचे गोल्डन व आभा कार्ड काढण्याची धडक मोहीम ७ ऑटोबर २०२३ पासून प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रांअंतर्गत येत असलेल्या उपकेंद्रामध्ये राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान आभा कार्ड व गोल्डन कार्ड काढण्यापासून वंचित असलेले लाभार्थींना या ठिकाणी बोलवून त्यांचे कार्ड काढण्यात आले.
मोहिमेदरम्यान जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुहास कोरे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन आभा कार्ड कसे काढावे याबाबत प्रत्यक्ष कृती करून दाखविली. जिल्ह्यातील प्रत्येक तालुयातील ज्या ठिकाणी या दिवशी गोल्डन व आभा कार्ड काढण्याबाबत शिबिर घेण्यात आले, त्या ठिकाणी जिल्हास्तरीय पर्यवेक्षक व जिल्हास्तरीय अधिकारी तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन ही मोहीम यशस्वीपणे राबविली.Dhadak campaign यामध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र पार्डी टकमोर अंतर्गत येत असलेल्या कळंबा महाली, खरोळा, भटउमरा, सावंगा व प्राथमिक आरोग्य केंद्र पार्डी टकमोर याप्रमाणे बर्याच गावांना प्रत्यक्ष भेटी देऊन गोल्डन कार्ड व आभा कार्ड स्वतः काढून दाखविले.एकही लाभार्थी गोल्डन कार्ड व आभा कार्डपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याबाबत सर्व आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांना सूचना दिल्या. प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र येथे औषधी पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याचे सांगितले.