बुलडाणा,
Radheshyam Chandak : सध्या संपुर्ण जग विविध कारणांनी निर्माण होणार्या प्रदुषणांचा सामना करीत आहे. या प्रदुषणामुळे वातावरणात बदल झाला असून निसर्गचक्र बदललेले दिसुन येते त्यासाठी जागतीक पातळीवर प्रयत्न केले जात आहे. प्रदुषणाचे एक कारण वायु प्रदुषण हे ही आहे. विविध कंपन्यामधील चिमणीमधुन निघणारा धुर तसेच वाहनांच्या वाढलेल्या संख्येमुळे वाहनातील निघणारा धूर यामुळे मोठ्या प्रमाणात वायुप्रदुषण होत आहे. यासाठी शासन स्तरावरुन ई-व्हेईकलचा पर्याय शोधला असुन त्यासाठी मोठ्या प्रमाणात ई-व्हेईकलसाठी वाहनधारकांना प्रोत्साहीत केले जात आहे. अशी माहिती (Radheshyam Chandak) बुलढाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी दिली आहे.
बुलडाणा अर्बन बुलडाणा शहरातील वायु प्रदुषण कमी व्हावे (Radheshyam Chandak) यासाठी ई-अँटोरिक्षा फायनान्स करीत आहे, ई-अँटोरिक्षा एका चार्जमध्ये 80 ते 100 कि.मी चालते. इलेक्ट्रीक चार्जंग दर कमी असल्यामुळे अँटोरिक्षा चालक कमी दराने प्रवासी वाहतुक करतील परिणामी लोकांनाही त्याचा फायदा मिळेल. यास्तव संस्थेने प्रायोगीक तत्वावर 100 अॅटोरिक्षा सवलतीच्या व्याजदराने देण्याचे ठरविले असुन या ई-रिक्षांची किंमत 1 लाख 50 हजार पासुन 2 लाख 50 हजार रुपयापर्यंत आहेत. ज्या अॅटोरिक्षा चालकांना या अॅटो खरेदी करावयाच्या असतील त्यांनी संस्थेच्या बुलडाणा शहरातील कोणत्याही शाखेत संपर्क साधुन साधा अर्ज सादर करावा.
या कर्ज प्रकरणात संस्था 80% पर्यंत कर्ज उपलब्ध करुन देईल. सदर कर्ज तिन-तिनच्या गटात वितरीत करण्यात येईल तरी इच्छुक ई-अॅटोरिक्षाधारकांनी संस्थेशी संपर्क साधावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी केले आहे. या योजनेमुळे बुलडाणा शहरातील वायु प्रदुषण काही प्रमाणात तरी नियंत्रणात येईल या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला तर ही योजना बुलडाणा अर्बनच्या सर्व शाखांवर सुरु करता येईल असेही राधेश्याम चांडक (Radheshyam Chandak) यांनी स्पष्ट केले.