रुग्णालयांना शासनाचे भक्कम पाठबळ गरजेचे

09 Oct 2023 19:58:35
नागपूर,
Hospitals गोरगरीब जनतेचा शासकीय रुग्णालयांवर विश्वास कायम रहायला हवा, परिस्थितीत सुधारणा हवी आणि यासाठी यंत्रणेला शासनाचे भक्कम पाठबळ असायला हवे, असे उबाठा गटाचे आ. आदित्य ठाकरे यांनी आज नागपुरात स्पष्ट केले.नांदेडच्या मेडिकलमध्ये काही दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात मृत्यू झाले. या पृष्ठभूमिवर आज विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, खा. विनायक राऊत व आ. आदित्य ठाकरे नागपुरात आले. सायंकाळी त्यांनी मेडिकल रुग्णालयात जाऊन प्रभारी अधिष्ठाता डॉ. देवेंद्र माहोरे, उपअधिष्ठाता डॉ. उदय नारलावार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. शरद कुचेवार, इतर वैद्यकीय अधिकार्‍यांसोबत त्यांनी चर्चा केली. रुग्णालयासंबंधी सद्यस्थिती जाणून घेतली.त्यानंतर या तिनही नेत्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला.
 
 
aditya thakare
 
नांदेड घटनेनंतर आम्हीही आंदोलन करू शकलो असतो. पण, याबाबत कुठलेही राजकारण नको. या परिस्थितीतून मार्ग काढायला हवा. प्रत्येत ठिकाणी जाऊन अधिष्ठात्यांसोबत चर्चा करा, मार्ग काढण्याचा प्रयत्न करा, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले असल्याचे आ. आदित्य ठाकरे यांनी प्रारंभीच स्पष्ट केले.ते म्हणाले, रुग्णालयात औषध पुरवठा असल्याचे 29 जुलैलाच ट्वीट केले होते. आताही परिस्थिती तशीच आहे. पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. आजाराचे प्रमाण वाढल्याने शासकीय रुग्णालयात रुग्णही वाढले आहेत. सरकार कुणाचेही असो, शासनातर्फे उपाय होणे आवश्यक आहे.Hospitals परिस्थितीत सुधार (रिफॉर्म) व्हायला हवा. शासकीय रुग्णालयांवरील जनतेचा विश्वास उडायला नको, याचा विचार राजकीय क्षेत्राने करायला हवा.नांदेड घटनेची सखोल चौकशी व्हायलाच हवी. दोषींवर कारवाई होईल. पण, पुढे काय? परिस्थितीत सुधार व्हावा, यासाठी अधिष्ठात्यांना अधिकार वाढवून द्यायला हवेत. अधिकारांचे विकेंद्रीकरण व्हावे. रिक्त पदे तातडीने भरावी. उपकरणे, औषधांचा मुबलकत पुरवठा वेलेवर व्हावा.आरोग्य यंत्रणेने वेळोवेळी आढावा घ्यावा. इतर यंत्रणांनी त्यांच्या स्तरावर कामे वेळेत करायला हवीत. सत्तेत आल्यानंतर कामांवर फोकस अपेक्षित होता. प्रशासनाला पाठबळ नसेल तर ते शासन कसले? असे आदित्य ठाकरे म्हणाले.दुष्यंत चतुर्वेदी, किशोर कुमेरिया, प्रमोद मानमोडे, विशाल बरबटे, राधेश्याम हटवार व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

पत्रकारांनी विचारलेल्या राजकीय प्रश्नावर आदित्य ठाकरे यांनी बोलायचे टाळले. पुणे व चंद्रपूरला पोटनिवडणूक लवकर घ्यायला हवी. संसदेत तेथील प्रश्न मांडायला लोकप्रतिनिधीच नाहीत. ‘एनडीए का भारत जितेगा इंडिया’ एवढेच ते उत्तरले.
Powered By Sangraha 9.0