मुलीला विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपींना सश्रम कारावास

09 Oct 2023 19:14:53
गोंदिया, 
Rigorous imprisonment बँकेत उच्चपदावर असलेल्या व्यक्तीशी लग्न लावून देण्याचा आमिष देऊन अल्पवयीन मुलीचे अपहरण करून विक्री करण्याच्या बेतात असलेल्या तिघांना जिल्हा सत्र न्यायालयाने 6 ऑक्टोबर रोजी तीन वर्षांचा सश्रम कारावास व 9 हजार रुपये दंड ठोठावला. तारा श्रीराम कुंभरे (40), रवी श्रीराम कुंभरे (29) व गुणवंत उर्फ भुरी श्रीराम कुंभरे (33) सर्व राहणार पिपरीया ता. सालेकसा असे शिक्षा ठोकवण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
 
 
Rigorous imprisonment
 
सालेकसा तालुक्यातील 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला 14 एप्रिल 2018 रोजी तालुक्यातीच पिपरिया येथील आरोपी तारा कुंभरे, रवी कुंभरे व गुणवंत कुंभरे यांनी बँकेत उच्च पदावर असलेल्या व्यक्तीसोबत लग्न लावून देण्याचे आमिष देत चाळीसगाव येथे दोन दिवस ठेवून तिला विकण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, तिने संधी साधून घरातील मंडळींना फोनद्वारे कळविले. यावर सालेकसा पोलिसांनी तिचा शोध घेत आरोपींच्या विरोधात भादंवि कलम 363, 366, 34 अन्वये गुन्हा दाखल करून आरोपींना ताब्यात घेतले होते. प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक मनोहर इस्कापे यांनी करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले. Rigorous imprisonment दरम्यान, प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश ए. टी. वानखेडे यांनी शुक्रवारी प्रकरणाची सुनावणी करताना तिन्ही आरोपींना दोषी ठरवत तीन वर्षांचा सश्रम कारावास व 9 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिन्यांचा अतिरिक्त करावास ठोठावला आहे. न्यायालयाने सात साक्षीदार तपासले. पीडितेच्या बाजूने सरकारी वकील पुरुषोत्तम आगाशे व एम. एम. पालकर यांनी युक्तिवाद केला. न्यायालयीन कामकाजासाठी पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनात महिला पोलिस शिपाई माधुरी गजभिये यांनी सहकार्य केले.
...
Powered By Sangraha 9.0