सरकारची दिवाळी; जीएसटी संकलन 1.72 लाख कोटींवर

01 Nov 2023 19:55:56
नवी दिल्ली, 
ऑक्टोबर महिन्यात वस्तू व सेवा कर अर्थात् GST collection जीएसटी संकलनातून केंद्र सरकारच्या तिजोरीत 1.72 लाख कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. देशभरात जीएसटी लागू झाल्यापासून आतापर्यंतचे हे दुसरे सर्वोच्च संकलन ठरले आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयाने बुधवारी याबाबतची आकडेवारी जाहीर केली. मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात जीएसटीच्या माध्यमातून 1.52 लाख कोटी रुपयांचा महसूल सरकारला प्राप्त झाला होता. अवघ्या वर्षभरात त्यात 13 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
 
 
Gst dksl
 
यावर्षीच्या ऑक्टोबरमधील GST collection जीएसटी संकलन आतापर्यंतच्या काळातील दुसरे सर्वाधिक संकलन ठरले आहे. यापूर्वी, याचवर्षीच्या एप्रिल महिन्यात जीएसटीच्या माध्यमातून 1.87 लाख कोटी रुपयांचा महसूल सरकारच्या तिजोरीत जमा झाला होता, असे अर्थ मंत्रालयाने आज जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. चालू आर्थिक वर्षात सरासरी मासिक जीएसटी संकलनात मागील वर्षांच्या तुलनेत 11 टक्के वाढ होऊन संकलनाचा आकडा 1.66 लाख कोटी रुपये झाला आहे. जीएसटी संकलन मागील महिन्यातील व्यवहारांशी संबंधित तिमाही अखेर समायोजन आणि अर्थव्यवस्थेतील एकूण गतीचा फायदा झाला, असे आयसीआरएच्या मु‘य अर्थतज्ज्ञ आदिती नायर यांनी सांगितले. आक्टोबरमध्ये देशांतर्गत व्यवहार 13 टक्क्यांनी वाढल्याचेही स्पष्ट झाले आहे.

gst-graph 
 
केंद्रीय जीएसटी 30,062 कोटी
राज्यांचा जीएसटी 38,171 कोटी
एकीकृत जीएसटी 91,315 कोटी
अधिभार 12,456 कोटी
 
एकूण जीएसटी संकलन 1,72,003
Powered By Sangraha 9.0