नागपूर,
Butibori Industrial Estate : बुटीबोरी औद्योगिक वसाहतीमध्ये राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेने (नीरी) प्रकल्प पवित्र अंतर्गतअद्ययावत सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारले असून प्रतिदिन 50 घनमीटर सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची त्याची क्षमता आहे. या केंद्राचे लोकार्पण आज नीरीचे माजी संचालक डॉ. सुकुमार देवोटा, वर्तमान संचालक डॉ. अतुल वैद्य यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
या (Butibori Industrial Estate) प्रकल्पाचे प्रमुख नीरीचे वरिष्ठ अतिरिक्त वैज्ञानिक डॉ. गिरीश पोफळी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे वरिष्ठ अभियंता सुनील आकुलवार, व्हीएनआयटीचे निवृत्त स्थापत्य अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. व्ही. ए. म्हैसाळकर, नवी दिल्लीच्या वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषदेचे वरिष्ठ अतिरिक्त वैज्ञानिक डॉ. हेमंत कुलकर्णी, निवृत्त मुख्य वैज्ञानिक डॉ. हेमंत पुरोहित, वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. साधना रायलू, मुख्य वैज्ञानिक डॉ. पवन लाभसेटवार, लार्स एन्व्हायरो प्रा. लिमिटेडचे सीईओ डॉ. रमेश दर्यापूरकर उपस्थित होते.
या (Butibori Industrial Estate) अद्ययावत केंद्रात तांत्रिक पर्यायांमध्ये कॉम्पॅक्ट आणि सुधारित मूव्हिंग बेड बायो-फिल्म रिअॅक्टर तसेच सबमर्ज्ड एरोबिक फिक्स्ड फिल्मचा अंतर्भाव आहे. मूव्हिंग बेड बायो-फिल्म रिअॅक्टर केवळ कचरा विघटित करत नाही, सांडपाण्याचे नायट्रिफिकेशन आणि डिनायट्रिफिकेशनसाठी मदतही करते. सांडपाण्यातील सेंद्रिय घटक कमी करण्यासाठी सबमर्ज्ड एरोबिक फिक्स्ड फिल्मचा वापर केला जातो.
सांडपाण्याचा पदार्थ. नीरीने इंडो-युरोपियन जल तंत्रज्ञान कार्यक्रम ‘होरायझन 2020’ प्रकल्पाचा भाग म्हणून बुटीबोरी औद्योगिक वसाहतीत हा (Butibori Industrial Estate) प्रकल्प पवित्र उभारण्याचे कार्य केले. डॉ. अतुल वैद्य, डॉ. गिरीश पोफळी, कार्यकारी अभियंता नितीन नाईक, प्रवीण शेष यांच्या नेतृत्वाखालील चमू यासाठी कार्यरत होती. हा प्रकल्प उच्चक्षमतेने सुधारित स्वच्छता प्रदान करेल. पोषक तत्वांनीयुक्त प्रकि‘या केलेले सांडपाणी पुन्हा सार्वजनिक उद्यानांमध्ये बागकाम करण्यासाठी वापरले जाईल.