ही लढाई आरपारची

01 Nov 2023 18:30:05
- सर्वपक्षीय बैठकीनंतर मनोज जरांगेंची भूमिका
 
जालना, 
मराठा आरक्षणाच्या मुद्यावर सर्वपक्षीय बैठक पार पडल्यानंतर अंतरवाली सराटी येथे उपोषण करीत असलेले मराठा आंदोलक Manoj Jarange मनोज जरांगे यांनी, समाजाचा किती अंत पाहता, असा उलट सवाल केला. उपोषणाला 8 दिवस झाल्यानंतर सरकार वेळ मागत आहे. वेळ दिला तर आम्हाला आरक्षण मिळणार का, असा प्रश्न त्यांनी केला.
 
 
Manoj Jarange
 
आपण पुढील निर्णय समाजाशी बोलून घेणार असल्याचे सांगताना, ही लढाई आरपारची असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारला किती वेळ द्यायचा. मला त्यांच्यासोबत बोलण्याची इच्छा नाही. सरकार गोर-गरिबांच्या लेकरांवर गुन्हे दाखल करीत आहे. वेळ कशासाठी हवा, कुणबी प्रमाणपत्र कशाला पाहिजे हे सांगा. सरकारने काढलेला अध्यादेश आम्हाला मान्य नाही. आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे. आम्हाला अर्धवट आरक्षण नको, अशी भूमिका Manoj Jarange जरांगे यांनी घेतली.
 
सरकारने येथे येऊन बोलावे
सरकारने चर्चेसाठी आवाहन केले, याकडे लक्ष वेधले असता, तुम्ही इकडे येऊन बोला, तुम्हाला गरज असेल तर या, असे जरांगे यांनी म्हणाले. सगळे पक्ष एकच असल्याची टीका त्यांनी केली. नुसती कागदं देऊन फसवू नका. आरक्षण कसे देणार, हे आधी सांगा. मागच्या वेळीही आरक्षण देणार, असे सर्वपक्षीय बैठकीत ठरले होते, पण त्यावर कार्यवाही झाली नसल्याकडेही जरांगे यांनी लक्ष वेधले.
Powered By Sangraha 9.0