दोन हजार रुपयांच्या 97 टक्के नोटा परतल्या
दिनांक :01-Nov-2023
Total Views |
मुंबई,
दोन हजाराच्या 97 टक्क्यांपेक्षा जास्त नोटा बँकिंग यंत्रणेत परतल्या आहेत आणि केवळ 10 हजार कोटी रुपये मूल्य असलेल्या अशा नोटा अद्याप नागरिकांकडे आहेत, अशी माहिती Reserve Bank of India भारतीय रिझर्व्ह बँकने बुधवारी दिली. दोन हजाराची नोट चलनातून मागे घेत असल्याची घोषणा रिझर्व्ह बँकेने 19 मे रोजी केली होती.
चलनातून मागे घेण्यात आली त्यावेळेस म्हणजे 19 मे रोजी बाजारात 3.56 लाख कोटी रुपये मूल्याच्या दोन हजार रुपयांच्या नोटा होत्या. 31 ऑक्टोबर रोजी त्याचे प्रमाण 0.10 लाख कोटी रुपयांवर आले, असे Reserve Bank of India रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या देशातील 19 कार्यालयांमध्ये दोन हजार रुपयांची नोट बदलणे शक्य आहे.