अकोला,
Seed production program : जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या माध्यमातून गहू या पिका साठी ग्राम बीजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत शासनाकडून बियाण्यासाठी अनुदान देण्यात असून, शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी बुधवार 1 नोव्हेंबर रोजी येथे केले आहे.
गहू पिकाला बियाणे 40 किलो प्रतिएकर (0.40 हे.) मर्यादेत एक शेतकर्याला 640 रू. अनुदानावर देय आहे. (Seed production program) अनुदानासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात परमिट वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी मूळ आधारकार्ड, सातबारा आणि मागासवर्गीय शेतकरी असल्यास जातीच्या दाखल्याची स्वयंस्वाक्षांकित प्रत आवश्यक आहे असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. या योजनेत सर्वसाधारण,अनु. जाती, अनु. जमाती प्रवर्गातील अत्यल्प किंवा अल्पभूधारक (अपंग, महिला, माजी सैनिक, आत्महत्याग्रस्त कुटुंब) शेतकर्यांना 0.40 हेक्टर मर्यादेपर्यंत 40 किलो बियाणे प्रतिलाभार्थी मिळू शकेल व प्रथम येणार्यास प्रथम तत्वावर वाटप करण्यात येणार आहे.
प्रमाणित बियाणे वितरण घटका अंतर्गत गहू पिकाचे वाण उपलब्धतेप्रमाणे वितरित होत आहे. जिल्ह्यातील शेतकर्यांनी मंडळ कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून अधिकृत बियाणे वितरकाकडून अनुदानित दराने ग्राम बीजोत्पादन खरेदीचा लाभ घ्यावा, असे आवाहन किरवे यांनी केले आहे. (Seed production program) अधिक माहितीसाठी कृषी विभागाच्या नजिकच्या कार्यालयाशी तसेच महाबीज कार्यालयाशी संपर्क साधावा असेही ते म्हणाले.