संस्थानच्या जमिनी अतिक्रमण मुक्त करुन ताब्यात द्या : सिध्दचैतन्य महाराज

*मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन

    दिनांक :01-Nov-2023
Total Views |
साखरखेर्डा, 
Veerashaiva Lingayat Samaj : वीरशैव लिंगायत संप्रदाय हा संपूर्ण महाराष्ट्रात विखुरलेला असून वीरशैव लिंगायत समाजाचे 70 हून अधिक मठ आहेत. या मठांना मिळालेल्या जमिनीवर काही लोकांनी अतिक्रमण करून ताब्यात घेतल्या आहेत . त्या जमिनी अतिक्रमण मुक्त करुन संस्थानच्या ताब्यात द्याव्यात अशी मागणी सर्व संस्थानच्या वतीने सिध्दचैतन्य शिवाचार्य महाराज (Veerashaiva Lingayat Samaj) यांनी केली आहे .
 
Veerashaiva Lingayat Samaj
 
महाराष्ट्रातील मठांची देखभाल करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात (Veerashaiva Lingayat Samaj) प्रत्येक संस्थानला 100 एकरापासून 500 एकर पर्यंत जमीन दान दिली आहे . आजही त्या जमिनीचा सात बारा नझुल दप्तरात संस्थानच्या नावाने आहे . परंतू काही ठिकाणी त्या जमिनीवर लोकांनी ताबा करुन बनावट 7/12 केला आहे .मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कायदा करुन संस्थानच्या जमिनी अतिक्रमण मुक्त कराव्यात आणि संस्थानच्या ताब्यात द्याव्यात अशी मागणी उपस्थित सर्व मठाधिपती यांनी श्री महास्वामी पलसिध्द महाराज संस्थानचे Veerashaiva Lingayat Samaj मठाधिपती सिध्दचैतन्य शिवाचार्य महाराज यांच्या नेतृत्वाखाली 31 आक्टोंबर रोजी रात्री 11 वाजता वर्षा निवासस्थानी भेट घेतली असता उपरोक्त मागणी केली .
 
 
त्याच बरोबर मठ , मंदिर , गौ -शाळा , पाठशाळा , गुरुकुल , मठाचा विकास करण्यासाठी प्रत्येक संस्थानला तिर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात यावा . शासनाच्या वतीने निधीची तरतूद करण्यात यावी . आजही अनेक ठिकाणी गौशाळा , पाठशाळा , गुरुकुल चालविले जातात . विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते . त्यांच्या राहण्याची सोय व्हावी आणि Veerashaiva Lingayat Samaj धार्मिक वारसा जोपासला जावा हा मुख्य उद्देश प्रत्येक संस्थानचा आहे . मठ स्वरक्षण कायदा व समाजातील अडचणी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर मांडण्यात आल्या . साखरखेर्डा येथील महास्वामी पलसिध्द महाराज यांच्या 965 व्या स्मृतीप्रीत्यर्थ 4 सप्टेंबर रोजी खासदार प्रतापराव जाधव यांच्या हस्ते निमंत्रण सुध्दा मिळाले होते . परंतू शासन आपल्या दारी या व्यस्त कार्यक्रमामुळे येवू शकलो नाही .
 
 
भविष्यात निश्रि्चत साखरखेर्डा मठाला भेट देऊन काही सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराजांच्या शिष्टमंडळाला दिले . या शिष्टमंडळाने मन्नथ स्वामी यात्रेला शासकीय पुजेसाठी मुख्यमंत्री महोदयांना निमंत्रण दिले . यावेळी Veerashaiva Lingayat Samaj सद्गुरू सिध्ददयाळ महाराज ( बेटमोगरा ) , सद्गुरू वेदान्ताचार्य दिगांबर शिवाचार्य महाराज ( वसमत , हिंगोली ) , सद्गुरू शिवशंकर शिवाचार्य महाराज अमरावती , मरुळसिध्द शिवाचार्य महाराज वाशिम , काशिनाथ शिवाचार्य महाराज परभणी , शिवचैतण्य शिवाचार्य महाराज हदगाव , नांदेड , विश्वचैतन्य शिवाचार्य महाराज आष्टी , जालना यांचेसह 50 हून अधिक मठधिपती उपस्थित होते.