कृत्रिम प्रकाश प्रदूषणाचे घातक परिणाम

light pollution शहरातून चांदण्या स्पष्ट दिसत नाहीत

    दिनांक :01-Nov-2023
Total Views |
वेध
- नीलेश जोशी
 
light pollution भौतिक सुखाच्या लालसेपोटी मानवाने बुद्धीच्या बळावर नवनवीन शोध लावले. सुख मिळविण्यासाठी दैवी देणगीच्या रूपात मिळालेल्या दानाचे शोषण माणूस सतत करीत आहे. मनुष्याच्या या हव्यासाचे दुष्परिणाम गत काही वर्षांपासून भोगावे लागत आहे. वसुंधरेने दिलेल्या दानाला प्रदूषित करण्याचे पातक रोज होत आहे. light pollution  जल, वायू, ध्वनी, जमीन तर प्रदूषित झालीच आहे. आता कृत्रिम प्रकाशाच्या प्रदूषणाचे दुष्परिणाम समोर येत आहेत. निसर्गाने मनुष्य शरीराची रचना अशी केली आहे की, शरीराचा विकास, दिनक्रम दिवस आणि रात्र या जैविक घड्याळानुसार चालते. पण हे जैविक घड्याळच विस्कळीत होत असल्याचे चित्र आहे. light pollution निसर्ग नियमानुसार सूर्योदयापासून ते सायंकाळी अंधार पडेपर्यंत आणि अंधार पडल्यानंतर असे जैविक घड्याळ प्रत्येकाच्या शरीरात कार्यरत असते. light pollution मात्र, गत काही वर्षांत हे घड्याळ विस्कळीत झाल्याने मधुमेह, कर्करोग, लठ्ठपणा आणि हृदयरोगासारख्या गंभीर आजाराने ग्रस्त असणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
 
 

light pollution 
 
 
या संदर्भात २००१ साली नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या मासिकात दोन शोध निबंध प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यातही रात्रीच्या वेळी दीर्घकाळ कृत्रिम प्रकाशात राहिल्यास छातीच्या कर्करोगाची शक्यता अधिक असते, असे म्हटले होते. light pollution स्वाभाविकच आपणा सर्वांना रात्रीची झोप पूर्ण होणे या संदर्भात वरील बाबी असतील असे वाटेल, पण हा प्रश्न केवळ रात्रीची पूर्ण झोप घेण्यासंदर्भात नसून आपल्या सभोवताली आणि आपण सतत वापरत असलेल्या उपकरणांच्या कृत्रिम प्रकाशामुळे होेणाऱ्या दुष्परिणामाबाबत आहे. मानवी शरीरातील तयार होणारे मेलॅटोनिन हार्मोन प्रकाश आणि अंधारावर अर्थात दिवस आणि रात्र अवलंबून असते. जर व्यक्ती उजेडात झोपली तर तिच्या शरीरात तयार होणाऱ्या मेलॅटोनिनवर परिणाम होतो. light pollution ते शरीरात कमी प्रमाणात तयार होते. याचा परिणाम शांत आणि पूर्ण झोपेवर होतो. त्यातून अनेक प्रकारांच्या व्याधी उत्पन्न होतात. त्यात डोकेदुखी, आळस, ताण, चिंता, लठ्ठपणा यात वाढ होते तर काही वेळा कॅन्सरसारख्या व्याधी उद्भवतात.
 
 
light pollution शरीरात मेलॅटोनिन नावाच्या हार्मोनची निर्मिती तेव्हाच होते जेव्हा डोळ्यांना अंधाराचा संकेत मिळतो. हे हार्मोन शरीरातील प्रतिकार शक्तीपासून ते कोलेस्ट्रोरोलचे प्रमाण कमी-अधिक करण्यापर्यंतचे काम करतात. एका अर्थाने निरोगी शरीराकरिता आवश्यक असलेल्या बाबी करण्याचे काम या हार्मोनचे असते. light pollution संगणक, लॅपटॉप, मोबाईल स्क्रीनमधून येणारा प्रकाशसुद्धा या सर्व बाबींमध्ये बाधा निर्माण करतो. त्याचे दुष्परिणाम केवळ डोळ्यांवरच नव्हे तर शरीरावरही होत असल्याचे भयावह वास्तव आहे. जल, वायू, ध्वनी, जमीन या प्रदूषणाबाबत चर्चा होते. पण प्रकाश हे प्रदूषणाचे कारण असू शकेल, असे वाटत नाही. पण शहरातून आकाशात दिसणाऱ्या चांदण्या आणि जंगलातील एखाद्या गावखेड्यातून आकाशात दिसणाऱ्या चांदण्या पाहिल्या की कृत्रिम प्रकाशामुळे होणारे प्रदूषण लक्षात येईल. light pollution दिवसा चांदण्या न दिसण्याचे कारण प्रखर सूर्यप्रकाश असतो तर याच पृष्ठभूमीवर शहरातून चांदण्या स्पष्ट न दिसण्याचे कारण कृत्रिम प्रकाश आहे. प्रकाशाच्या विभिन्न घटकांचा चुकीच्या पद्धतीने आणि अनिर्बंध वापरामुळे रात्रीच्या आकाशाला लालसर तांबूसपणा येतो. जेथे दिव्यांचा झगमगाट अधिक असतो तेथे कृत्रिम प्रकाश प्रदूषण जास्त असते.
 
 
कृत्रिम प्रकाश प्रदूषणाची झळ केवळ मानवालाच नव्हे तर पशुपक्ष्यांनाही सहन करावी लागते. प्रखर प्रकाश असल्याने अनेक पक्ष्यांना दिवस आणि रात्रीचा अंदाज येत नाही. light pollution त्यातही हवामानानुसार स्थलांतरण करणाऱ्या पक्ष्यांना कृत्रिम प्रकाश संभ्रमित करतो. हे पक्षी चंद्र आणि तारे पाहून दिशा ठरवितात, पण अनेकदा कृत्रिम प्रकाशाने त्यांचा अंदाज चुकतो. अंदाज चुकल्याने लवकर किंवा उशिरा स्थलांतरण हे पक्षी करतात. त्यामुळे चुकीच्या ऋतूत पोहोचून प्रतिकूल हवामानाने या पक्ष्यांना प्राण गमवावा लागत असल्याचेही निरीक्षण पक्षिमित्रांचे आहे. light pollution मानवासह सजीव सृष्टीला धोकादायक ठरणारे कृत्रिम प्रकाश प्रदूषण दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येते. त्यातही महानगराचा दर्जा असलेल्या शहरांमध्ये तर रात्रीही लख्ख प्रकाश असतो तर दुसरीकडे रात्री उशिरा ते पहाटेपर्यंत काही जण गरज म्हणून तर काही विरंगुळा म्हणून कृत्रिम प्रकाशाच्या सान्निध्यात राहतात. light pollution कृत्रिम प्रकाशामुळे वाढत असलेल्या जीवघेण्या आजारांच्या पृष्ठभूमीवर याबाबत जनजागरण होणे आवश्यक आहे.
९४२२८६२४८४