दिल्ली वार्तापत्र
- श्यामकांत जहागीरदार
sachin-sara-divorce राजस्थान विधानसभा निवडणुकीत माजी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी ते राजकीय कारणाने नाही तर व्यक्तिगत कारणाने चर्चेत आले आहे. sachin-sara-divorce टोंक मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरल्यानंतर पत्रकारांशी बोलताना पायलट यांनी, मी सर्वांना माफ केले, राजस्थान प्रदेश काँग्रेसमध्ये कोणतेच मनभेद आणि मतभेद नाहीत. आम्ही निवडणूक जिंकू आणि राज्यात पुन्हा सरकार स्थापन करू, असा दावा केला. sachin-sara-divorce मी सर्वांना माफ केले, असे सांगताना पायलट यांनी कोणाचे नाव घेतले नसले, तरी त्यांचा रोख मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्याकडे आहे, हे सगळ्यांना समजले आहे. राज्यातील विधानसभा निवडणूक काँग्रेस भाजपाच्या विरोधात नाही तर काँग्रेसमधील गहलोत आणि पायलट गट एक-दुसऱ्याच्या विरोधात लढवत आहेत. sachin-sara-divorce त्यातच मी मुख्यमंत्रिपद सोडायला तयार असलो, तरी मुख्यमंत्रिपद मला सोडत नाही आणि सोडेल असे वाटतही नाही, असे विधान करून गहलोत यांनी पायलट यांना डिवचले आहे.
काँग्रेस आधी आपला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करत नाही तर पक्षाला बहुमत मिळाल्यानंतर काँग्रेसचे नेतृत्व कोणाला मुख्यमंत्री करायचे हे ठरवते, असा टोला पायलट यांनी गहलोत यांना लगावला आहे. sachin-sara-divorce काँग्रेस नेतृत्वाच्या सूचनेवरून पायलट यांनी अशोक गहलोत यांना माफ केल्याचे त्यांच्या विधानावरून दिसते. पायलट यांनी खरोखर गहलोत यांना माफ केले की माफ केल्यासारखे ते दाखवतात, हे यथावकाश स्पष्ट होणार आहे. मात्र, उमेदवारी अर्ज भरताना पायलट यांनी जे प्रतिज्ञापत्र सादर केले, त्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली. sachin-sara-divorce पायलट यांचा घटस्फोट झाला, ही ती माहिती आहे. हा घटस्फोट का झाला, कधी झाला, याचा तपशील अजून बाहेर आलेला नाही. खरं म्हणजे कोणाचे लग्न असो वा घटस्फोट ही त्यांची व्यक्तिगत बाब असते. त्यामुळे त्याची जाहीरपणे चर्चा करण्याचे कारण नाही. पण पायलट यांच्या घटस्फोटाची राज्यात जोरात चर्चा सुरू झाली. sachin-sara-divorce कारण पायलट हे राजस्थानच्या राजकारणातील काँग्रेसचे महत्त्वाचे आणि महत्त्वाकांक्षी असे नेते आहेत तर त्यांची पत्नी साराही काही मामुली व्यक्ती नाही, तर ती जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री तसेच नॅशनल कॉन्फरन्सचे नेते डॉ. फारुक अब्दुल्ला यांची मुलगी तसेच उमर अब्दुल्ला यांची बहीण आहे.
सचिन पायलट यांचे वडील राजेश पायलट हेही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री होते. म्हणजे सचिन आणि सारा हे दोघेही राजकीय घराण्यातील आहेत. पायलट यांना आरन आणि विहान अशी दोन मुलं आहेत आणि ही मुले सध्या आपल्या वडिलांजवळ आहेत. sachin-sara-divorce २०१८ ची विधानसभा निवडणूक लढवताना पायलट यांनी जे प्रतिज्ञापत्र सादर केले होते, त्यात पत्नी म्हणून सारा यांचा उल्लेख केला होता. सचिन पायलट यांनी जेव्हा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तेव्हा सारा पायलट त्या कार्यक्रमाला उपस्थितही होत्या. याचा अर्थ मागील विधानसभा निवडणुकीनंतर तसेच या विधानसभा निवडणुकीच्या आधी कधीतरी त्यांचा घटस्फोट झाला असावा. सचिन पायलट आणि सारा अब्दुल्ला यांचा प्रेमविवाह होता. दिल्लीत पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर सचिन पायलट एमबीएसाठी लंडनला गेले, सारा पण तेव्हा शिक्षणासाठी तेथेच होती. राजकीय घराण्यातील असल्यामुळे दोघे एकमेकांना तसे आधीपासून ओळखत होते. sachin-sara-divorce लंडनमध्ये एका पार्टीत दोघांची भेट झाली, त्यानंतर त्यांची मैत्री झाली, काही काळाने ती प्रेमात परिवर्तित झाली. सचिन भारतात परत आल्यानंतरही दोघांची मैत्री कायम होती. काही वर्षांनी दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पायलट हिंदू तर सारा मुस्लिम, त्यामुळे या लग्नाला थोडा विरोध झाला.
सचिन पायलट यांची आई रमा पायलट यांनी या लग्नाला परवानगी दिली. sachin-sara-divorce कारण तोपर्यंत राजेश पायलट यांचे निधन झाले होते. राजेश पायलट यांच्या निधनानंतर दौसा लोकसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत रमा पायलट विजयी झाल्या होत्या. पण साराचे वडील डॉ. फारुक अब्दुल्ला या लग्नासाठी तयार नव्हते. २००४ मध्ये सचिन आणि सारा यांचे लग्न झाले. त्यावेळी साराच्या कुटुंबातील कोणीही उपस्थित नव्हते. विशेष म्हणजे सारा यांचे वडील फारुक अब्दुल्ला तसेच भाऊ उमर अब्दुल्ला या दोघांचेही प्रेमविवाह होते. फारुक अब्दुल्ला यांनी तर ख्रिश्चन मुलीशी विवाह केला होता तर उमर अब्दुल्ला यांनी शीख मुलीशी. sachin-sara-divorce तरीही या दोघांनी साराच्या प्रेमविवाहाला विरोध केला, हे आश्चर्य होते. साराच्या लग्नाच्या वेळी फारुक अब्दुल्ला अमेरिकेत तर भाऊ उमर अब्दुल्ला रुग्णालयात दाखल होता, असे म्हणतात. sachin-sara-divorce सारा एका हिंदू तरुणाशी विवाह करणार असल्यामुळे त्याला जम्मू-काश्मीरमधील मुस्लिम समाजातील एका वर्गाचा विरोध होता, असे म्हणतात. त्यामुळे अब्दुल्ला कुटुंब राजकीय कारणामुळे या विवाहाला तयार नव्हते, असेही म्हटले जाते. वडिलांच्या अपघाती मृत्यूनंतर सचिन पायलट यांनी दौसा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली आणि जिंकली.
सचिन पायलट यांनी लोकसभेची निवडणूक जिंकल्यानंतर डॉ. फारुक अब्दुल्ला यांनी जावाई म्हणून सचिन पायलट यांना स्वीकारले; पुढे त्यांचे संबंध सुरळीत झाले. त्यामुळेच सचिन आणि सारा यांचा घटस्फोट हा राजकीय चर्चेचा विषय झाला.
sachin-sara-divorce राजस्थान विधानसभेची यावेळची निवडणूक सचिन पायलट यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. या निवडणुकीतून त्यांच्या राजकीय भवितव्याचा निर्णय होणार आहे. गेल्या पाच वर्षांपासून पायलट यांचा डोळा मुख्यमंत्रिपदावर आहे. २०१८ मध्ये हातातोंडाशी आलेला मुख्यमंत्रिपदाचा घास अशोक गहलोत यांनी हिसकला. काँग्रेस नेतृत्वाच्या आदेशाने गहलोत यांनी पायलट यांचा उपमुख्यमंत्री म्हणून आपल्या मंत्रिमंडळात समावेश केला तसेच त्यांच्याकडील प्रदेशाध्यक्षपदही कायम ठेवण्यात आले. पायलट यांनी गहलोत यांच्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला, पण गहलोत यांनी पायलट यांना कधीच मनापासून स्वीकारले नाही. sachin-sara-divorce त्यामुळे पायलट दुखावले गेले ते कायमचे ! पायलट यांनी गहलोत यांच्याविरुद्ध एकदा नाही तर दोनदा बंड केले. पण त्यांच्या दुर्दैवाने ते यशस्वी होऊ शकले नाही.
काँग्रेसचे नेतृत्व खरं म्हणजे पायलट यांच्या बाजूने होते. पायलट यांना मुुख्यमंत्री करायची काँग्रेसच्या नेतृत्वाची इच्छाही होती. त्यामुळेच अशोक गहलोत यांना काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव त्यांच्यापुढे मांडण्यात आला. गहलोत यांच्या जागेवर सचिन पायलट यांना मुख्यमंत्री करण्याची तयारी काँग्रेसच्या नेतृत्वाने केली होती. sachin-sara-divorce पण धूर्त आणि चाणाक्ष गहलोत यांनी ती हाणून पाडली. राजस्थानचे मुख्यमंत्रिपद माझ्याकडे कायम ठेवत असाल तर मी काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष होतो, असा सशर्त प्रस्ताव त्यांनी काँग्रेसच्या नेतृत्वासमोर ठेवला, तो मान्य होणे शक्य नव्हते. यावेळी राज्यात काँग्रेसला बहुमत मिळाले तर काँग्रेसचे नेतृत्व सचिन पायलट यांना मुख्यमंत्री करू शकते, याची जाणीव गहलोत यांनाही आहे. sachin-sara-divorce त्यामुळेच ते सचिन पायलट यांची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. यात कोण बाजी मारणार ते ३ डिसेंबरला समजणार आहे.
९८८१७१७८१७