फुलगाव,
Maharashtra Kesari : गतवर्षीचा महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेला शुक्रवारी अवघ्या साडे पाच सेकंदात चितपट करून गंगावेस तालमीत मेहनत घेणार्या सिंकदर शेखने यंदाच्या 66 व्या ‘महाराष्ट्र केसरी’चा किताब पटकावला. सिंकदर शेखला मानाची चांदीची गदा व महिंद्रा थार प्रदान करण्यात आली. प्रदीपदादा कंद व पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि भारतीय कुस्ती महासंघ व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या सहकार्याने पुणे जिल्ह्यातील फुलगाव येथे 66 वी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत सिकंदर शेख विजयी झाला.
या Maharashtra Kesari केसरी कुस्ती स्पर्धेची अंतिम लढत सिंकदर शेख आणि शिवराज राक्षे यांच्यात झाली. सिकँदरने प्रतिस्पर्धी शिवराज राक्षेला 5.37 सेकँदाला झोळी डावावर चितपट केले. या लढतीत सिकंदरचे पारडे निश्चित जड होते, पण शिवराज त्याला आव्हान देईल अशी अपेक्षा होती. मात्र, वेगवान व आक‘मक कुस्ती खेळणार्या सिकंदरपुढे शिवराजचा निभाव लागला नाही. लढत सुरु झाल्यानंतर अवघ्या काही सेकंदात सिकंदरने झोळी डाव घेत शिवराजला उचलून खाली घेतले आणि त्याच स्थितीत शिवराजला चितपट करून विजेतेपदाचा मान मिळविला.
सिंकदरने माती विभागातून, तर शिवराजने गादी विभागातून प्रतिस्पर्ध्यांवर सहज मात करून अंतिम फेरी गाठली होती. Maharashtra Kesari सिकंदरने मातीवरील अंतिम विभागात आपला लौकिक कायम राखताना वेगवान आणि आक्रमक खेळ करत पहिल्या फेरीतच संदीपवर सातत्याने ताबा मिळवत सलग दोन गुणांचा सपाटा लावला आणि दहा गुणांची वसुली करत तांत्रिक वर्चस्वावर विजय मिळवून केसरी किताबाच्या लढतीची अंतिम फेरी गाठली होती. सिकंदर शेखचा इथपर्यंतचा प्रवास मात्र मोठा खडतर राहिला आहे. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळचा हा कुस्तीपटू अतिशय गरीब घरातील असून त्याचे वडील रशिद शेख यांना देखील कुस्तीचा भारी नाद आहे.
पारितोषिक वितरणप्रसंगी Maharashtra Kesari महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष खासदार रामदास तडस, मुरलीधर मोहोळ, स्वागताध्यक्ष, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सदस्य प्रदीप कंद, कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे, विलास कथुरे, योगेश दोडके यावेळी उपस्थित होते. विजेत्या सिकंदरला थार गाडी, चांदीची गदा असे पारितोषिक देण्यात आले. उपविजेता शिवराज ट्रॅक्टरचा मानकरी ठरला. या स्पर्धेत 36 जिल्हा आणि 6 महानगरपालिका असे 42 संघ भिडले. या स्पर्धेत 36 जिल्हा आणि 6 महानगरपालिका असे एकूण 42 संघ सहभागी झाले होते. एका कुस्ती संघात गादी विभागातील 10 आणि माती विभागातील 10 असे एकूण 20 कुस्तीगीर 2 कुस्ती मार्गदर्शक आणि 1 संघ व्यवस्थापक असे एकूण 23 जणांचा सहभाग होता. साधारण या कुस्ती स्पर्धेत 840 कुस्तीगीर 84 कुस्ती मार्गदर्शक आणि 42 व्यवस्थापक, 80 पंच आणि 50 पदाधिकारी असे एकूण 1100 जणांचा सहभाग होता.