मौलाना रहिमुल्ला तारिकची कराचीत हत्या

मसूद अझहरचा होता निकटवर्तीय

    दिनांक :13-Nov-2023
Total Views |
कराची, 
अज्ञात व्यक्तींकडून विदेशातील दहशतवाद्यांच्या Assassination हत्या सुरूच असून, या यादीत आता आणखी एक नाव जोडले गेले आहे. Assassination जैश-ए-मोहम्मदचा अतिरेकी आणि या संघटनेचा प्रमुख मसूद अझहरचा निकटवर्तीय मौलाना रहिमुल्ला तारिकची कराचीमध्ये अज्ञातांनी गोळ्या घालून हत्या केली. भारताच्या विरोधात मौलाना नेहमीच गरळ ओकायचा. कंधार विमान अपहरणावेळी मसूद अझहरसोबत त्याची सुटका करण्यात आली होती.
 
 
Rahimullah Tariq
 
Assassination कराचीतील ओरंगी टाऊन येथे एक भारतविरोधी सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत सहभागी होण्यासाठी मौलाना रहिमुल्ला जात होता. त्यावेळी अज्ञात हल्लेखोरांनी त्याची हत्या केली. मृत्युमुखी पडलेल्याचे नाव मौलाना रहिमुल्ला तारिक आहे. एका धार्मिक सभेत जात असताना त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. हे लक्ष्यित हत्येचे प्रकरण दिसत आहे, असे कराची पोलिसांनी सांगितले.
 
Assassination पाकिस्तानात अलिकडे भारतविरोधी अतिरेक्यांची गोळ्या घालून हत्या केली जात आहे. लष्कर-ए-तोयबाचा माजी कमांडर अक्रम खान ऊर्फ अक्रम गाझी याचीही नुकतीच गोळ्या घालून हत्या करण्यात आली. अक्रम भारताच्या विरोधात नेहमी विष ओकायचा. २०१८ ते २०२० या कालावधीत तोयबामध्ये अतिरेक्यांच्या भरतीचे काम तो पाहायचा. तो तोयबाच्या वरिष्ठ कमांडर्सपैकी एक होता. दीर्घकाळापासून तो अतिरेकी कारवायांमध्ये सहभागी होता.
 
Assassination पाकिस्तानात होत असलेल्या हत्यांमुळे अतिरेक्यांची झोप उडाली आहे. मागील महिन्यात भारताचा एक वॉण्टेड अतिरेकी लतिफची सियालकोट येथे हत्या करण्यात आली. २०१६ मध्ये पठाणकोट वायुतळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा लतिफ सूत्रधार होता. पाकिस्तानात बसून तो वायुतळावर हल्ला करणाऱ्या अतिरेक्यांना निर्देश देत होता. त्यापूर्वी ६ मे रोजी लाहोर येथे अज्ञात हल्लेखोरांनी खलिस्तान कमांडो फोर्सचा प्रमुख परमजितसिंग पंजवडची हत्या केली होती.