प्रधानमंत्री विश्‍वकर्मा योजनेचा लाभ घ्या : रविंद्र गोटेफोडे

13 Nov 2023 18:28:31
कुरखेडा, 
Pradhan Mantri Vishwakarma Yojana केंद्र शासनाने हस्त कारागिरांना प्रोत्साहन देण्याकरिता प्रधानमंत्री विश्‍वकर्मा कौशल्य सन्मान योजना ही महत्वाकांक्षी योजना सुरू केली आहे. जिल्हा व तालुक्यातील पारंपरिक पद्धतीने आपला व्यवसाय करीत असलेल्या पात्र लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेत पारंपरिक व्यवसायाला आधुनिकतेची जोड द्यावी, असे आवाहन प्रधानमंत्री विश्‍वकर्मा योजनेचे आरमोरी विधानसभा सहसमन्वयक तथा भाजपा ओबीसी आघाड़ीचे जिल्हा महामंत्री रवींद्र गोटेफोडे यांनी केले.
 
 
Pradhan Mantri Vishwakarma Yojana
 
सदर योजने अंतर्गत असंघटीत क्षेत्रात स्वंयरोजगार तत्वावर हात अवजाराने काम करणारे 18 कूटूंब आधारित पारंपरिक व्यवसायापैकी एका व्यवसायात गुंतलेले सूतार, लोहार, भांडी मूर्ती कारागीर, कुंभार, मूर्तिकार, सोनार, पादत्राणे कारागीर, गवंडी, न्हावी, माळी, परिट, शिंपी, मासेमारी जाळी बनविणारे आदी योजनेत पात्र आहेत. या कारागिरांना तज्ञ प्रशिक्षकांकडून कौशल्य विकास प्रशिक्षण, मूलभूत प्रशिक्षण, प्रगत प्रशिक्षण तसेच प्रशिक्षण कालावधीत पाचशे रूपये प्रतिदिवस विद्यावेतन व टूलकीट प्रोत्साहन म्हणून 15 हजार रूपये अनुदान देण्यात येणार आहे. Pradhan Mantri Vishwakarma Yojana प्रशिक्षणानंतर व्यवसायाकरीता आवश्यक चांगल्या व आधुनिक संसाधनाकरिता विनातारण व सवलतीच्या व्याजदरात सहज कर्ज उपलब्ध करून देण्यात मदत करण्यात येणार आहे. तसेच उत्पादित मालाला ब्रांड प्रमोशन तसेच मार्केट लिंकेजकरिता व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जेणेकरून व्यवसाय वृध्दिकरीता नविन संधी उपलब्ध होईल, हा योजनेमागील उद्दिष्ट आहे. योजनेच्या लाभाकरीता लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ग्रामपंचायतच्या सि. एस. सी. केंद्रातून अर्ज करावा लागणार आहे. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीने अर्जाला मान्यता दिल्यावर पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे. पात्रतेचा निकष पूर्ण करणार्‍या इच्छूकांनी तातडीने अर्ज करावा, असे आवाहन रवींद्र गोटेफोडे यांनी केले आहे.
Powered By Sangraha 9.0