नागपूर,
diwali pahat-nagpur नागपूरकांची पहाट सध्या सुमधूर सुरांनी होत आहे. ठिकठिकाणी दिवाळी पहाटचे कार्यक्रम होत आहेत. आज स्वरवेधतर्फे सायंटिफिक सभागृह, लक्ष्मीनगर येथे आगळावेगळा कार्यक्रम झाला. diwali pahat-nagpur याचे वेगळेपण म्हणजे ज्येष्ठ नागरिकांचा उत्साही सूर. diwali pahat-nagpur ह्या ग्रुपच्या सदस्यांनी तरुणांनाही लाजवतील अशी एकापेक्षा एक सरस गाणी सादर करुन “हम किसीसे कम नही” हे कार्यक्रमाचे नाव सार्थ केले. कार्यक्रमात गाणाऱ्यांचा आणि रसिकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. diwali pahat-nagpur
कार्यक्रमात एकंदर २४ गाणी डॉ. प्रफुल्ल मुकादम, अरुण नलगे, सुधीर मेश्राम, त्रिभुवन मेश्राम, प्रकाश खोत, नंदू अंधारे, डॉ. मोहन शनवारे, वैशाली पावनसकर, नीलिमा मोहिते, डॉ. शीला कुलकर्णी, डॉ. दत्तात्रय गारवे आणि अरुण ओझरकर यांच्या समुहाने सादर केली. diwali pahat-nagpur संकल्पना ॲड. भानुदास कुलकर्णींची होती. मुकुंद देशपांडेंच्या नेटक्या आणि खुमासदार निवेदनाने आणि सिंथेसायझरवर गोविंद गडीकर आणि महेंद्र ढोले, तबल्यावर सचिन बक्षी आणि ॲड् भानुदास कुलकर्णी, बासरीवर अरविंद उपाध्ये, व्हायोलिनवर अमर शेंडे, हार्मोनियमवर नरेंद्र कडवे, आक्टोपॅडवर सुभाष वानखेडे, ढोलकीवर दीपक कांबळे आणि मायनरवर विक्रम जोशी यांच्या उत्तम साथीने कार्यक्रमाला वेगळ्या उंचीवर नेले. diwali pahat-nagpur उद्या, मंगळवार १४ नोव्हेंबरला ”दिल अभी भरा नही“ हा अजरामर हिंदी गीतांचा कार्यक्रम होणार आहे.
सौजन्य : निरज दोंतुलवार, संपर्क मित्र