लालू यादवांच्या साथीदाराने लाटल्या जमिनी

14 Nov 2023 22:36:59
नवी दिल्ली,
Lalu Yadav जमिनीच्या मोबदल्यात नोकरी प्रकरणातील बेकायदेशीर सावकारी प्रकरणात अटक करण्यात आलेला Lalu Yadav लालू प्रसाद यादव यांचा निकटवर्तीय अमित कात्यालने नोकरीसाठी इच्छुक असलेल्यांकडून लालू यादव यांच्या वतीने जमिनी लाटल्या, असा दावा ईडीने केला आहे.
 
 
lalu
 
अमित कात्यालला ११ नोव्हेंबर रोजी ईडीने पहिले ताब्यात घेतले होते आणि त्यानंतर बेकायदेशीर सावकारी प्रतिबंधक कायद्याच्या अंतर्गत अटक केली. स्थानिक न्यायालयाने त्याला १६ नोव्हेंबरपर्यंत ईडीच्या कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. कात्याल एके इन्फोसिस्टिम्स प्रा. लि. कंपनीचा संचालक होता आणि या कंपनीने Lalu Yadav लालू यादव यांच्या वतीने एका उमेदवाराची जमीन घेतली होती, असे तपासात निष्पन्न झाल्याचा दावा ईडीने केला आहे. कंपनीचा नोंदणीकृत पत्ता डी-१०८८, न्यू फ्रेन्ड्स कॉलनी, नवी दिल्ली हा असून, ते घर लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांचे आहे.
 
लालू प्रसाद यादव Lalu Yadav रेल्वेमंत्री असताना अमित कात्यालया कंपनीने काही इतर जमिनीही घेतल्या होत्या. जमिनी घेतल्यानंतर कंपनीचे शेअर्स २०१४ मध्ये लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबीयांच्या नावावर करण्यात आले, असा दावा ईडीने केला आहे. कात्यालच्या परिसराच ईडीने मार्चमध्ये छापेमारी केली होती. कात्याल हा लालू यादव यांचा निकटवर्तीय असून, दोन महिन्यांपासून त्याने चौकशी टाळली, असे ईडीने सांगितले.
Powered By Sangraha 9.0