स्वच्छतेसाठी तत्पर मनपाचे 5,150 स्वच्छता कर्मचारी

14 Nov 2023 14:48:00
नागपूर,
 
clean-nagpur-nmc दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांकडून विविध प्रकारचे साहित्य खरेदी करण्यात येत असल्याने सगळीकडच्या बाजारपेठा व दुकाने गजबजून गेलेली दिसतात. clean-nagpur-nmc यामुळे नेहमी पेक्षा कचऱ्याच्या प्रमाणातही मोठया प्रमाणात वाढ झाल्याचे ‍दिसून येते. या अनुषंगाने नागपूर शहराला स्वच्छ, सुंदर आणि स्वस्थ साकारण्यासाठी मनपाचे स्वच्छता दूत, सफाई कर्मचारी आणि अधिकारी आपल्या सेवेस तत्पर आहेत. clean-nagpur-nmc दिवाळीनिमित्त मार्गांवर होणाऱ्या अस्वच्छतेचा नायनाट करण्याकरिता मनपाचे 5,150 कर्मचारी कार्यतत्पर होते. clean-nagpur-nmc दिवाळीनिमित्त नागपूर महानगरपालिकेच्या दहाही झोन निहाय स्वच्छता कर्मचाऱ्यांची आणि स्मार्ट स्वच्छता चमुची तैनाती करण्यात आली होती. clean-nagpur-nmc या सर्व कर्मचाऱ्यांनी नियमित स्वच्छतेचे कार्य करीत शहराला स्वच्छ साकारण्यात हातभार लावला आणि स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळी साजरी केली.
 
 
 
clean-nagpur-nmc
 
शहरातील प्रदूषणाच्या अनुषंगाने मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी नागपूरकरांना पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करावी तसेच कमीत कमी फटाके फोडावेत असे आवाहन केले होते. clean-nagpur-nmc याशिवाय अतिरिक्त आयुक्त  आंचल गोयल यांच्या निर्देशानुसार केंद्र सरकारच्या 'स्वच्छ भारत अभियान 2.0' अंतर्गत 'स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळी' या अभियानामध्ये स्वच्छताविषयक विविध उपक्रम राबविण्यात आले. दिवाळीच्या दिवसात मोठया प्रमाणात फटाकेही वाजविले जात असल्याने रस्त्यावरील कच-यात नेहमीपेक्षा अधिक भर पडल्याचे निदर्शनास येते. clean-nagpur-nmc यादृष्टीने लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फटाके वाजविण्याचे प्रमाण जास्त असल्याने शहरातील विविध मार्गांवर फटाक्यांचा कचरा जमा होऊ नये याकरिता मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ अभिजीत चौधरी यांच्या निर्देशनुसार, अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांच्या मार्गदर्शनात घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख तथा उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले आणि चमू यांनी मनपाचे सर्वच स्वच्छता कर्मचारी आणि स्मार्ट स्वच्छता चमू तैनात केले होते. clean-nagpur-nmc
 
 
यात मनपाच्या लक्ष्मी नगर झोनमध्ये 360 कर्मचारी, धरमपेठ झोनमध्ये 479 , हनुमान नगर झोनमध्ये 375, धंतोली झोनमध्ये 377, नेहरूनगर झोनमध्ये 358 , गांधीबाग झोनमध्ये 565 , सतरंजीपुरा झोन मध्ये 643 , लकडगंज झोनमध्ये 427 कर्मचारी, आसीनगर झोनमध्ये 548 आणि मंगळवारी झोनमध्ये 530 कर्मचारी तैनात होते. clean-nagpur-nmc याशिवाय इतर कर्मचारी व शहर स्वच्छतेसाठी विशेषाने तैनात स्मार्ट स्वच्छता चमूचे कर्मचारी देखील झोननिहाय तैनात करण्यात आले होते. या सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांनी नियमित कार्य करीत विविध मार्गांची स्वच्छता केली. तसेच मनपाच्या ‘स्मार्ट स्वच्छता चमू’ने स्वच्छता कार्य पार पाडले. आवश्यक त्या ठिकाणी उड्डाणपूलांवर मनपाद्वारे अत्याधुनिक स्वच्छता मशीनद्वारे स्वच्छतेचे कार्य करण्यात आले. clean-nagpur-nmc या मशीनद्वारे सूक्ष्म कचऱ्याची देखील विल्हेवाट लावण्यात मदत झाली.
Powered By Sangraha 9.0