स्नेहनगरात मुद्रा इव्हेंट्सची दिवाळी संध्या उत्साहात

mudra events-nagpur सूत्र संचालन मुकुंद देशपांडे यांचे

    दिनांक :14-Nov-2023
Total Views |
नागपूर,
 
mudra events-nagpur मुद्रा इव्हेंट्सचा दिवाळी संध्या हा सुगम संगीताचा कार्यक्रम स्नेहनगर जाॅगर्स पार्क येथे पार पडला. या कार्यक्रमाची संकल्पना मनीषा काशीकर यांची होती. mudra events-nagpur कार्यक्रमाची सुरुवात माजी महापौर संदीप जोशी यांनी दीप प्रज्वलनाने केली. यानंतर संदीप जोशी, कलोडे काकू, बंटी कुकडे, रितेश गावंडे, साहेबराव इंगळे, कल्पना तडस, वर्षा चौधरी यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात मुकुल पांडे, श्रेया खराबे, श्रुती बाईवार, मुकुंद कुथे, नम्रता नागपुरे, ऋचा येनुरकर, सवित्रु पोफळी, मनीषा काशीकर या गायक कलाकारांनी रंगत आणली. mudra events-nagpur
 
 
 
mudra events-nagpur
 
 
श्रीकांत पिसे, गौरव टांकसाळे, सुभाष वानखेडे, अनिकेत दहिकर यांनी साथ संगत केली. mudra events-nagpur प्रायोजक नारायण बाजारचे महेश तिडके, गार्डन सेंटरचे तुषार पडगीलवार व नीव होते. या कार्यक्रमात भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती लाभली. त्यांनी श्रोत्यांना संबोधित केले व मुद्रा इव्हेंट्सच्या कलाकारांचे कौतुक केले. mudra events-nagpur सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी या कार्यक्रमाचा समारोप केला. श्रेयाचे गगन सदन तेजोमय, मोरनी बागा मे, मुकुंद कुथेचे अबिर गुलाल, सैय्या, मुरलीधर श्याम, सवित्रु पोफळीचे पाहिले न मी तुला, झुठ बोले कौआ काटे, रुचा येनुरकरचे मेघा छाए आधी रात, श्रुती बाईवारचे ओ सजना, मुकुल पांडेचे या जन्मावर, ये श्याम मस्तानी, मनीषा काशीकरचे इक राधा इक मीरा, बोले रे पपीहरा तर नम्रता नागपुरेच्या दमा दम मस्त कलंदर या गाण्यांनी श्रोते मंत्रमुग्ध झाले. mudra events-nagpur कार्यक्रमाला उपस्थिती ही बरीच होती. सूत्र संचालन मुकुंद देशपांडे यांचे होते. स्पोरटियन फूटबाॅल क्लबचे शुभम आणि शंतनू यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
 
सौजन्य : मनीषा काशीकर, संपर्क मित्र