नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या यादीत घोळ

*ग्रामस्तरावर याद्या तयार, नाव नसल्याने शेतकर्‍यांमध्ये रोष

    दिनांक :16-Nov-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा
वर्धा, 
loss-affected farmers : जिल्ह्यात सोयाबीन पिकाच्या नुकसानाचे कृषी आणि महसूल विभागाला पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. यासाठी संयुक्त पंचनामे, प्राथमिक नुकसानाची यादी 16 ऑक्टोबरपर्यंत ग्रामस्तरावर शेतकर्‍याच्या याद्या प्रसिद्ध करण्याच्या सूचना होत्या. मात्र नुकसानाचे संयुक्त पंचनामे पूर्ण झाले नसल्याने याद्या प्रसिद्ध झाल्या नव्हत्या. आता ग्रामस्तरावर नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. मात्र, त्या यादीत नाव नसल्यामुळे शेतकर्‍यामध्ये रोष व्यक्त होत आहे. नव्याने यादी प्रसिद्धी करावी, अशी मागणी शेतकर्‍यांकडून होत आहे. कारंजा (घा.) तालुक्यातील शेतकर्‍यांनी या संदर्भात उपविभागीय अधिकार्‍यांकडे तक्रारही दिली आहे.
 
loss-affected farmers
 
जिल्ह्यात खरीप हंगामात 1 लाख 32 हजार 533 हेक्टरवर सोयाबीनची loss-affected farmers पेरणी शेतकर्‍यांनी केली होती. यापैकी 90 हजार 166 हेक्टरचा पीकविमाही शेतकर्‍यांनी काढला. जिल्ह्यात वातावरण बदलामुळे आलेल्या रोगरोईने सोयाबीन पीक भरण्याआधीच वाळले. नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मोबदला देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र ऐन पीक सवंगणीला आल्यावर प्रशासनाने पंचनामे करण्यासाठी आदेश काढले. या आदेशानुसार अंमलबजावणीसाठी महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकार्‍यांनी संयुक्त पंचनामे करायचे होते. मात्र, कमी कालावधी असल्यामुळे अधिकार्‍यांनी शक्कल लढवीत शेतकर्‍यांच्या बांधावर न जाता ग्रापं कार्यालयात शेतकर्‍यांना बोलावून पंचनाम्याच्या नोंदी घेतल्या. नुकसानग्रस्त शेतकर्‍यांची यादी करण्याची जबाबदारी ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांच्याकडे सोपविण्यात आली होती.
 
 
मात्र, ग्रामसेवकाने शेतकर्‍यांच्या बांधावर न जाता जवळच्या शेतकर्‍याच्या नोंदी घेतल्या. यात पडित शेती असलेला शेतकरी नुकसानीच्या यादीमध्ये त्याचे नाव समाविष्ट करण्यात आले आहे. ज्याचे खरच नुकसान झाले त्या शेतकर्‍याला यादीतून वगळण्यात आल्यामुळे रोष व्यक्त होत आहे. यावर्षी loss-affected farmers सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाकडून शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. यासाठी ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यांना पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, त्यांनी कार्यालयातून शेतकर्‍यांच्या नावाच्या नोंदी घेतल्या. मात्र, शेतकर्‍यांकडून आधार, बँक खाते, आयएफएससी कोड अजूनपर्यंत घेतल नाही. त्यामुळे या यादीत घोळ झाल्याचा आरोप शेतकर्‍यांनी केला आहे.
 
 
नुकसानग्रस्त एकही शेतकरी या पंचनाम्यातून सुटता कामा नये. अशा सूचना प्रशासनाने काढलेल्या पत्रात केल्या होत्या. शिवाय पडित शेती असलेल्या शेतकरी नुकसानाच्या यादीत loss-affected farmers समाविष्ट होणार नाही, याची काळजीघेण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, ग्रामसेवक व कृषी सहाय्यकांनी शेतकर्‍यांच्या बांधावर न जाता कार्यालयात बोलावून पंचनाम्याच्या नोंदी घेण्यात आल्या. मर्जितल्या शेतकर्‍याचे नाव यादीत समाविष्ट करण्यात आले. त्यामुळे त्या अधिकार्‍यांवर कारवाई करा, अशीही मागणी शेतकर्‍याकडून होत आहे.