नवी दिल्ली,
भारताने economy सर्वसमावेशक आणि विकसित देशाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रवास सुरू केल्याचे सांगत स्वावलंबी, स्पर्धात्मक, मजबूत अर्थव्यवस्था economy बनवण्यात स्वदेशी उद्योगांची मोठी भूमिका आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी केले. भारतीय आयुध निर्माणी सेवेतील अधिकारी आणि भारतीय संरक्षण लेखा सेवेच्या (आयडीएएस) परीविक्षाधीन अधिकाऱ्यांना संबोधित करताना त्या बोलत होत्या.
द्रौपदी मुर्मू म्हणाल्या, सरकारने गेल्या काही वर्षांत अनेक क्षेत्रात धोरणात्मक पुढाकार घेतला आहे आणि स्वदेशी डिझाईन, विकास आणि संरक्षण उपकरणांच्या निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी सुधारणा केल्या आहेत. भारताने सर्वसमावेशक आणि economy विकसित राष्ट्राचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रवास सुरू केला आहे. आपणा सर्वांना माहिती आहे की, स्वावलंबी, स्पर्धात्मक आणि मजबूत अर्थव्यवस्था बनवण्यात स्वदेशी उद्योगांची मोठी भूमिका आहे, असे राष्ट्रपती म्हणाल्या. आत्मनिर्भर भारत, मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया आणि नॅशनल स्किल डेव्हलपमेंट मिशन यासारख्या मोहिमा आणि उपक्रम हे या उद्देशासाठी काही प्रमुख कार्यक्रम आहेत, असे मुर्मू म्हणाल्या.
संरक्षण संपादन प्रक्रिया-२०२० अंतर्गत देशांतर्गत स्त्रोतांकडून भांडवली वस्तूंच्या खरेदीला प्राधान्य, औद्योगिक परवाना प्रक्रिया सुलभ करणे, थेट विदेशी economy गुंतवणूक धोरणाचे उदारीकरण, मिशन डीफस्पेस सुरू करणे, सृजन पोर्टल सुरू करणे या सारखे यासारखे उपक्रम स्वदेशीकरण सुलभ करणे आणि संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरता प्राप्त करण्याच्या उद्देशाने आहे, असेही राष्ट्रपती म्हणाल्या. आम्हाला माहीत आहे की, भारताची संरक्षण निर्यात आर्थिक वर्ष २०१३-१४ मध्ये ६८६ कोटी रुपयांवरून २०२२-२३ मध्ये जवळपास १६,००० कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे. भारताची संरक्षण निर्यात ८५ पेक्षा जास्त देशांमध्ये पोहोचली आहे आणि भारताच्या संरक्षण उद्योगाने जगाला डिझाइनमध्ये आपली क्षमता व विकास दर्शविला आहे, असे राष्ट्रपती म्हणाल्या.