तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
Dr. Sanjeev Joshi : यवतमाळ जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून भारतीय बालरोग तज्ञ संघटना यांच्या 2024 च्या केंद्रीय कार्यकारिणीमध्ये यवतमाळतील प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ. संजय जोशी यांची नियुक्ती झाली आहे. या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीमध्ये डॉ. जोशी यांनी भरघोस मतांनी विजय मिळवून यवतमाळचे नाव राष्ट्रीय पटलावर चमकवले आहे. या पदावर निवडून येणारे यवतमाळच्या इतिहासात ते पहिले डॉक्टर असून यवतमाळसाठी ही अभिमानाची बाब आहे. त्यामुळे त्यांच्यावर वैद्यकीय क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
दरवर्षी केंद्रीय कार्यकारिणीत महाराष्ट्रातील सात लोकांची निवड केली जाते. अतिशय प्रतिष्ठेची ही निवडणूक यवतमाळसार‘या जिल्ह्यातील फक्त 50 बालरोग तज्ञांच्या पाठबळावर जिंकणे जवळपास अशक्य आहे. परंतु जिल्ह्यातील बालरोग तज्ञांनी Dr. Sanjeev Joshi डॉ. जोशी यांंचा प्रचार करून संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांना 2010 मते मिळवून दिली आहेत, हे उल्लेखनीय.
विदर्भासाठी आणखी एक अभिमानाची बाब म्हणजे, नागपूरचे डॉ. वसंत खळतकर यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. डॉ. संजीव जोशी Dr. Sanjeev Joshi हे मागील तीस वर्षांपासून वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असून त्यांचे राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर भरीव योगदान आहे. डॉ. जोशी राष्ट्रीय बाल मेंदुरोग तज्ञ संघटनेचेसुद्धा राष्ट्रीय अध्यक्ष व विदर्भ बालरोगतज्ञ संघटनेचेसुद्धा अध्यक्ष आहेत.