आदिवासी समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी आ.अग्रवाल कटीबद्ध : रोहीत अग्रवाल

मरारटोली व संजयनगर येथे गायगोधन कार्यक्रम उत्साहात

    दिनांक :17-Nov-2023
Total Views |
गोंदिया, 
Rohit Agarwal : आदिवासी गोवारी समाज गायगोधन कार्यक्रमाच्या माध्यमातून संस्कृती जोपासत आहे. हे कौतुकास्पद आहे. समाजाच्या मागण्या व समस्यांची आ.विनोद अग्रवाल यांना जाणाीव आहे. या समस्या मार्गी लावण्यासाठी ते प्रयत्नही करीत आहेत. आदिवासी गोवारी शहिद स्मारकानंतर समाजभवन व्हावे, यासाठी आ.विनोद अग्रवाल यांचे प्रयत्न सुरू आहेत, असे प्रतिपादन आमदारांचे प्रतिनिधी रोहित अग्रवाल यांनी केले.
 
Rohit Agarwal
 
शहरातील छोटा गोंदिया, संजयनगर व मरारटोली येथे आदिवासी गोवारी समाज संघटन महाराष्ट्र शाखा गोंदियाच्या वतीने गोवर्धन पुजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते Rohit Agarwal बोलत होते. संघटनेचे अध्यक्ष सुशिल राऊत यांच्या मार्गदर्शनात गोवर्धन पुजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला गोकुल बोपचे, ध्रुव चचाने, तिर्थराज उके, संतोष पटले, अशोक सुरजजोशी, सुरज नेवारे, सुनिल भोयर, अरुण काळसर्पे, अरविंद राऊत, गोंविद वाघाडे, शारदा राऊत, वसंत नेवारे, नानू चचाणे, सुनिल सोनवाने, संतोष शहारे, मारोती नेवारे, अक्षय नेवारे, दिपक नेवारे, नितीन शहारे, संतोष नेवारे आदि मान्यवर उपस्थित होते.
 
 
याप्रसंगी अध्यक्ष सुशिल राऊत यांनी समाजाच्या समस्येवर प्रकाश टाकून मार्गदर्शन केले. Rohit Agarwal कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विकास नेवारे, नरेश नेवारे, आकाश कवरे, अतुल राऊत, मयुर सहारे, संजय ठाकरे, उमेश कुशराम, ओमकार चचाने, कमलेश गाते, शुभम नेवारे, विशाल नेवारे, निशाल नेवारे, रमेश नेवारे, ओमकार नेवारे, मोनु नेवारे, सुनिल नेवारे, प्रकाश सुरजजोशी, कैलाश नेवारे, शिवनाथ वाघाडे, उमेश राऊत, गोपाल नागोसे, किशोर राऊत आदिसह समस्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.