मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्रासाठी पुरावे सादर करा

18 Nov 2023 20:03:27
वर्धा, 
जिल्ह्यातील Kunbi Maratha Caste Certificate मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्रासाठी पात्र असलेल्या व्यक्तींकडून प्रमाणपत्रासाठी त्यांच्याकडे उपलब्ध असलेले कागदपत्र, पुरावे मागविण्यात आले आहे. अभिलेखे तपासणीसाठी जिल्ह्यात समिती स्थापन करण्यात आली असून समितीच्या कामकाजासाठी पुराव्यांची आवश्यकता आहे.
 
 
kunbi praman patra
 
शासनाने मराठा समाजाला मराठा कुणबी, कुणबी मराठा जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती विहित करण्यासाठी समिती स्थापन केली आहे. त्यानुसार जिल्ह्यात विभागांच्या समन्वयासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कक्ष व जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये विविध विभागांच्या अधिकार्‍यांचा समावेश आहे. या समितीमार्फत सक्षम प्राधिकार्‍यांनी दिलेले जात प्रमाणपत्र व जात पडताळणी समितीने घेतलेल्या निर्णयांच्या अनुषंगाने चर्चा होऊन समितीकडे वैध व अवैध करण्यात आलेल्या प्रकरणांची माहिती घेण्यात आलेली आहे.
 
 
 
जिल्हास्तरीय समितीस कामकाज अधिक गतीमान करण्यासाठी Kunbi Maratha Caste Certificate मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्रासाठी पात्र असलेल्या व्यक्तींकडे उपलब्ध असलेले कागदपत्र, पुरावे, वंशावळी, शैक्षणिक व महसुली पुरावे, संस्थानिकांनी दिलेल्या सनदा, राष्ट्रीय दस्तऐवज इत्यादी जुने अभिलेख्यांची आवश्यकता आहे. जिल्ह्यातील ज्या व्यक्ती मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्रासाठी पात्र आहे, अशा व्यक्तींनी त्यांच्याकडे उपलब्ध पुरावे जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू करण्यात आलेल्या विशेष कक्षात सादर करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
 
 
जिल्हास्तरीय समितीमार्फत जिल्ह्यातील सर्व विभागांच्या 1948 पूर्वीच्या तसेच 1948 ते 1967 या कालावधीतील सर्व 46 प्रकारच्या अभिलेखांची तपासणी करण्यात येत आहे. अभिलेख्यांमध्ये कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी नोंदींचा शोध घेतला जात आहे. सर्व विभागांना अभिलेखे तपासणीच्या सूचना देण्यात आलेल्या आहे.
Powered By Sangraha 9.0