- पत्नीच्या मानसिक त्रासामुळे आत्महत्या केल्याचे उघड
पुसद,
वसंतनगरच्या तरुण व्यवसायीने शनिवार, 18 नोव्हेंबरच्या दुपारी साडेबाराच्या दरम्यान राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. वसंतनगर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला असता पत्नीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे उघड झाल्यामुळे पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मृतकाचा भाऊ शेख मुशीरच्या तक्रारीवरून आयेशा सिद्दीकी (वय 28) हिच्याविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत. तर Sheikh Mudassir Sheikh Munir शेख मुदस्सीर शेख मुनीर उर्फ बब्बू (वय 30) असे आत्महत्या करणार्या तरुणाचे नाव असून त्याने काही दिवसांपूर्वी वसंतनगर मशिदीजवळ चायनीजचे हॉटेल सुरू केले होते. तो वाहन चालकाचेही काम करायचा.
Sheikh Mudassir Sheikh Munir : घटनेच्या दिवशी बब्बूने आपल्या भाड्याच्या घरात नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती भाऊ शेख मुशीरला दुपारी 1 च्या सुमारास मिळाली. बब्बूला तत्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृतक शेख मुदस्सीरचा 7 महिन्यांपूर्वीच आयेशा सिद्दीकीसोबत प्रेमविवाह झाला होता. पण विवाहानंतर दोघांमध्ये किरकोळ कारणावरून नेहमी खटके उडत होते, अशी माहिती मृतकाच्या भावाने पोलिसांना दिली. घटनेच्या दिवशीसुद्धा पतीपत्नीमध्ये भांडण झाले होते. या मानसिक त्रासाला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याची तक्रार वसंतनगर पोलिस ठाण्यात दिल्याने मृतकाच्या पत्नीविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. बब्बूच्यामागे पत्नी, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.