नवेगाव-नागझिरा Tiger project व्याघ्र प्रकल्प हे व्याघ्र विश्राम क्षेत्र म्हणून प्रसिद्ध असून येथे वर्षभर निसर्गप्रेमी, पर्यटकांची वर्दळ राहते. उल्लेखनीय म्हणजे, यंदा टी 4 वाघीणीने तिच्या 4 शावकांसह दर्शन दिल्याने येथे येणार्या पर्यटकांचा दिवाळीचा आनंद द्विगुणीत झाला.
नवेगाव-नागझिरा Tiger project व्याघ्र प्रकल्प आपल्या नैसर्गिक विविधतेमुळे प्रसिद्ध आहे. त्याचमुळे पर्यटकांसह निसर्ग अभ्यासकांची वर्षभर येथे वर्दळ राहते. विशेष म्हणजे, जंगलात मुक्तसंचार करणार्या वाघाला पाहण्याची प्रत्येकाची इच्छा या व्याघ्र प्रकल्पात पूर्ण होत असल्याने मागील काही वर्षात व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची संख्या वाढली आहे. प्रकल्पातील 9 प्रवेशद्वाराने यंदा दिवाळी सणादरम्यान हजारो पर्यटकांनी भेट दिली असून त्यांना टी 4 वाघिणीसह तिच्या 4 शावकाचे दर्शन पर्वणी ठरली आहे. अनेकांनी याचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.